Electric-Vehicle sakal media
अर्थविश्व

इ वाहनांची बॅटरी बदलण्यासाठी मुंबईत दीड वर्षांत 500 स्थानके

अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि युलूचा उपक्रम

कृष्ण जोशी

मुंबई : अदाणी इलेक्ट्रिसिटी (Adani electricity) व युलू तर्फे येत्या दीड वर्षांत मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी (vehicles battery) बदलण्यासाठी तसेच ती वाहने चार्ज करण्यासाठी पाचशे पॉइंट्स (स्थानके) उभारली जातील. येथे चोवीस तास वाहने चार्ज (vehicle charging) करता येतील. या चार्जिंग पॉईंटसाठी वीज पुरवण्याचे काम अदाणीतर्फे केले जाईल. तर येथे आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (electrical vehicle) संपलेल्या बॅटरी काढून त्यांना चार्ज केलेल्या बॅटरी युलू तर्फे दिल्या जातील. वाहनांच्या बॅटरी चार्जिंगला वेळ लागत असल्याने त्याऐवजी फक्त बॅटरी बदलल्या की त्यांचा वेळ वाचेल.

युलू तर्फे बीकेसी मध्ये तसेच नवी मुंबईत अनेक इलेक्ट्रिक दुचाकी प्रवासासाठी वाहने ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वायूप्रदूषण तसेच वाहतूक कोंडी कमी होण्याची खात्री आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी तसेच बॅटरी बदलण्यासाठी पहिले स्थानक अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईतर्फे (एईएमएल) बीकेसीमध्ये उभारले जाईल. नंतर युलू तर्फे या सेवेचा मुंबईभर गरजेनुसार विस्तार केला जाईल, असे अदाणी च्या प्रवक्त्याने सांगितले.

‘युलू’ ची नवी ई-बाइक ही टिकाऊ असून पर्यावरणप्रेमींना तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कामगार वर्गाला उपयुक्त ठरेल. इंधनाचे वाढते दर, महागडी वैयक्तिक वाहने खरेदी करण्यातील सर्वसामान्यांची असमर्थता, चालक परवान्याचा अभाव यासारख्या अडचणींवर या ई बाईक वरदान ठरतील. तसेच यामुळे स्वच्छ व हरित पर्यावरणाचे ध्येय गाठता येईल. मुंबईतील प्रवासाच्या विद्युतीकरणातील हे पहिले पाऊल आहे, असे युलू बाईक चे सहसंस्थापक अमित गुप्ता म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT