अर्थविश्व

अदानी समुहाला गंगावरम बंदरात 10.4% गुंतवणुकीची परवानगी

ओमकार वाबळे

भारताचे व्यापार नियामक मंडळ आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. अदानी पोर्ट्स आणिस्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडद्वारे गंगावरम पोर्ट लिमिटेडच्या 10.4% इक्विटी शेअर होल्डिंगच्या प्रस्तावित अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने माहिती दिली आहे.

अदानी जीपीएल आंध्र प्रदेश सरकारकडून हे इक्विटी शेअर्स घेणार आहेत. अहमदाबाद स्थित अदानी ग्रुप हा भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक आहे. पोर्ट मॅनेजमेंट, रिन्यूएबल एनर्जी, एअरपोर्ट ऑपरेशन्स आणि डिफेन्स सेक्टरमध्येही अदानी ग्रूप सक्रिय आहे.

गुजरात, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशा या सहा सागरी राज्यांमध्ये 11 देशांतर्गत बंदरे चालवणाऱ्या अदानी समूहाचे जाळे पसरले आहे. एपीएसइझेड (APSEZ) ही कंपनी बंदर परिसरात अंतर्गत पायाभूत सुविधा पुरवते.

गंगावरम पोर्ट लिमिटेडकडे (जीपीएल) आंध्र प्रदेशातील गंगावरम पोर्टची मालकी आहे. यामध्ये अदानी समूह शेअर्स घेत आहे. अदानी समूहाने हे बंदर बिल्ड-ओव्न-ऑपरेट-ट्रान्सफर या तत्त्वावर बंदर घेतले आहे. ३० वर्षांच्या कार्यकाळासाठी सवलतीच्या दरात अदानी हे बंदर वापरतात.

व्यावसायिक घडामोडी सुरू झाल्याच्या तारखेपासून 20 वर्षांच्या कालावधीसाठी बंदराचा करार आहे. तसेच पुढील कालावधीसाठी प्रत्येकी दहा वर्षांची मर्यादा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT