Adani Group News
Adani Group News Sakal
अर्थविश्व

Adani Group News : अदानींनी एका दिवसात गमावले ₹ 1,97,98,78,80,000, पाकिस्तानच्या परकीय...

सकाळ डिजिटल टीम

Adani Group News : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम अदानी समूहाच्च्याया शेअर्सवर दिसून येत आहे. अदानी यांनी हिंडेनबर्गविरोधात कायदेशीर लढाईची तयारी केली आहे.

मात्र या अहवालामुळे अदानीच्या समभागांची घसरण थांबता थांबत नाही. हिंडेनबर्गनंतर रेटिंग एजन्सी, परदेशी गुंतवणूकदार यांच्या धक्क्यांचा परिणाम म्हणजे अदानीच्या शेअर्स आणि मालमत्तेत मोठी घसरण झाली आहे.

शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, अदानी समूहाचे तीन शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. शेअर्सच्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या वैयक्तिक मालमत्तेलाही फटका बसला आहे.

पुन्हा टॉप 20 मधून बाहेर :

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 58 बिलियन डॉलरवर आली आहे. एका दिवसापूर्वी 60 अब्ज डॉलर पार केले होते.

अदानींनी शुक्रवारी 2.4 अब्ज डॉलर म्हणजेच 1,97,98,78,80,000 रुपयांचा धक्का बसला. या घसरणीमुळे ते फोर्ब्सच्या रियल टाइम अब्जाधीशांच्या यादीत पुन्हा 17व्या क्रमांकावरून 22व्या क्रमांकावर घसरले आहेत.

एकेकाळी 150 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश म्हणून ओळखले जाणारे गौतम अदानी या यादीत 22 व्या क्रमांकावर घसरले आहेत.

पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळी एवढे नुकसान :

अदानीच्या मालमत्तेतील घसरणीची तुलना ढासळत चाललेल्या पाकिस्तानशी केली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अदानी यांनी एका दिवसात जेवढी संपत्ती गमावली आहे तेवढीच पाकिस्तानकडे शिल्लक आहे.

हेही वाचा : वेळ सिमेंट आणि बँकांच्या शेअरमध्ये अभ्यासपूर्ण गुंतवणूक करण्याची

3 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तानचा परकीय चलन साठा 170 दशलक्षने कमी होऊन 2.91 अब्ज डॉलर इतका झाला आहे. स्वतःला वाचवण्यासाठी पाकिस्तान आयएमएफसमोर मदत मागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT