

abhishek bachchan and Aishwarya Rai Bachchan
esakal
Aishwarya Rai’s Instagram Post for Abhishek Bachchan : बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चनने आज (५ फेब्रुवारी) ५०वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याची पत्नी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने त्याला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
ऐश्वर्याने इन्स्टावर अभिषेकचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिषेकचे केवळ डोळेच दिसत आहेत. अन् पोस्टमध्ये ऐश्वर्या अभिषेकला प्रेमाने "बेबी पापा" असंही म्हणाली आहे.
ऐश्वर्या रायने तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की, "प्रिय बेबी पापा, ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला देव भरपूर प्रेम, शांती, आनंद, समाधान आणि चांगले आरोग्य देवो. तसेच, पोस्टमध्ये शेवटी ‘’Stay Golden… Shine on Love’’ असंही ऐश्वर्याने म्हटलंय.
गुरू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन प्रेमात पडले होते. यानंतर मग त्यांनी २००७ मध्ये लग्न केले. त्यांचा विवाह सोहळा खूप मोठ्या थाटामाटात पार पडला, होता. पुढे २०११ मध्ये त्यांना मुलगी झाली जिचे नाव आराध्या आहे.
खरंतर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. अलिकडेच त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, अभिषेकने याचे स्पष्टपणे खंडण केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.