

RCB Win WPL 2026
Sakal
RCB’s Second WPL Trophy: वूमन्स प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचे (WPL) विजेतेपद स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहे. बडोद्यात झालेल्या अंतिम सामन्यात गुरुवारी बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने पराभूत केले आणि दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.
याआधी बंगळुरूने (RCB) २०२४ मध्येही विजेतेपद मिळवले होते. मात्र दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) सलग चौथ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाले आहेत.