Gautam Adani sakal
अर्थविश्व

Adani Group : अडचणीत आणणाऱ्या Hindenburg विरोधात अदानी कायदेशीर कारवाईच्या विचारात

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Adani Group Share Crash : अदानी समूह हिंडनबर्ग रिसर्चच्या समभाग विक्रीच्या नुकसानीबाबत कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहे.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

कंपनीच्या शेअर विक्रीला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास प्रमुख 'दंडात्मक कारवाई' करण्याचा विचार करत असल्याचे अदानी समूहातर्फे सांगण्यात आले.

हिंडेनबर्गच्या अहवालात गौतम अदानींच्या नेतृत्वाखालील गटावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांच्या एक दिवसानंतर अदानी समूहाकडून वरील कायदेशीर कारवाईचं विधान करण्यात आले आहे.

शेअर बाजारातील अस्थिरता ही चिंतेची बाब

हिंडेनबर्गच्या आरोपांमुळे विविध व्यवसायाशी संबंधित समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे, असे अदानी समुहाचे कायदेशीर व्यवहार प्रमुख जतीन जलुंधवाला म्हणाले,

ते म्हणाले की, हिंडेनबर्गकडून कोणत्याही अभ्यासाशिवाय आणि चुकीच्या उद्देशाने हे संशोधन केले आहे. तसेच तो 24 जानेवारी 2023 रोजी प्रकाशित केला आहे. यामुळे अदानी समुहाच्या गुंतवणुकदारांवर आणि शेअर्सवर विपरीत परिणाम झाला आहे.

या अहवालामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी चढ-उतार पाहण्यास मिळाली आहे, जी अत्यंत चिंतेची बाब असल्याचे जलुंधवाला म्हणाले.

प्रकाशित करण्यात आलेला हा अहवाल आणि त्यातील विधाने ही केवळ सामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मात्र, यामुळे अदानी समुहाच्या शेअर्सना मोठं नुकसान होत आहे.

या सर्व बाबींचा आणि समुहाला होत असलेल्या नुकसानीचा विचार करता आम्ही यूएस आणि भारतीय कायद्यांतर्गत हिंडेनबर्गने प्रकाशित केलेल्या अहवालाविरोधात तोडगा काढण्याचा आणि दंडात्मक कारवाईचा विचार करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT