sensex.jpg
sensex.jpg 
अर्थविश्व

तांत्रिक बिघाड, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे कामकाज ठप्प

सकाळ ऑनलाइन टीम

मुंबई- स्पॉट निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्समध्ये लाइव्ह प्राइस कोटमधील तांत्रिक बिघाडामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) आज (बुधवार) ट्रेडिंगचे कामकाज ठप्प झाले. डिस्काऊंट ब्रोकरेज फर्म जिरोधा यांनी सांगितले की, सर्व ब्रोकर्ससाठी एनएसई इन्डेक्सोच्या (निफ्टी 50, निफ्टी बँक तसेच इतर) लाइव्ह टिक्समध्ये काहीतरी बिघाड झाला आहे..हा बिघाड दूर व्हावा यासाठी आम्ही एनएसईच्या संपर्कात आहोत. दरम्यान, बीएसई सेन्सेक्सच्या लाइव्ह प्राइस कोट सुरळितपणे सुरु असून ते अपडेट होत आहे. 

एनएसईनेही टि्वट करुन याची माहिती दिली आहे की, कनेक्टिव्हिटीसाठी एनएसईकडे दोन सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे अनेक टेलिकॉम लिंक आहेत. दोन्ही सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या लिंक्समध्ये अडचणी असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे एनएसईच्या यंत्रणेवर याचा परिणाम झाला आहे. ही यंत्रणा लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत. दरम्यान, या बिघाडामुळे सर्व सेगमेंट 11.40 वाजता बंद करण्यात आले आहे. बिघाड दूर होताच पुन्हा सर्व सुरळित सुरु होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

निफ्टी 50 इंडेक्स मागील बंदच्या तुलनेत 113 अंक वर जाऊन 14820 वर जाऊन थांबला. तर निफ्टी बँक सकाळी 10.15 ते 1.45 या काळात उसळीसह 35,626.60 वरच अडकला आहे. दरम्यान, निफ्टी आणि निफ्टी बँक फ्यूचर सामान्य स्थितीने अपडेट होत आहे. एनएसई एकत्रित केले जाणारे सर्व 11 सेक्टर्सचे लाइव्ह प्राइस कोटही तांत्रिक बिघाडामुळे एनएसईमध्ये अपडेट होत नाहीत. 

बुधवारी भारतीय शेअर बाजारच्या बेंचमार्क शेअर्समध्ये थोडीसी तेजी दिसून आली. यामध्ये एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, लार्सन अँड ट्रूबो, आयसीआयसीआय बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचा प्रामुख्याने समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT