Airtel increases minimum monthly recharge tariff 
अर्थविश्व

'एअरटेल'चे ग्राहक आहात? मग आता..

वृत्तसंस्था

मुंबई, ता 30 (वृत्तसंस्था): दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने किमान मासिक 'रिचार्ज प्लॅन'च्या शुल्कात वाढ केली आहे. एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना आता महिनाभर सेवा सुरू ठेवण्यासाठी अधिक शुल्क द्यावे लागणार आहे. कंपनीच्या नव्या प्लॅननुसार, एअरटेलचा किमान मासिक 'रिचार्ज प्लॅन'  करण्यासाठी आता 45 रुपयांचे  रिचार्ज करावे लागणार आहे. याआधी ग्राहकाला 23 रुपये द्यावे लागत होते. आता आणखी 22 रुपये  मोजावे लागणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असेल. यामध्ये डेटा किंवा कॉलिंगसाठी मिनिटे मिळणार नाहीत. तर, लोकल किंवा एसटीडी कॉलिंगसाठी 2.5 पैसे/सेकंद, व्हिडिओ कॉलिंगवर 5 पैसे/सेकंद, डेटा वापरासाठी 50पैसे/एमबी शुल्क आकारले जाणार आहे 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार,  एअरटेल नेटवर्क सुरु ठेवयाचे असल्यास किमान 45 रुपयांचे रिचार्ज करणे ग्राहकांना गरजेचे आहे. किमान रिचार्ज केल्यास  सेवा सुरू राहणार आहे. जर एअरटेलचा एखादा ग्राहक 45 रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्रीपेड रिचार्ज करीत नसेल तर त्याला सेवा न देण्याचा अधिकार असेल. यामध्ये मर्यादित सेवांसोबत 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ (ग्रेस पीरियड) ग्राहकांना दिला जाईल. ग्रेस पीरियड संपल्यानंतर मात्र ग्राहकाची सेवा संपुष्टात आणली जाईल. एअरटेलचे नवीन टॅरिफ दर 29 डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT