Amazon Jobs esakal
अर्थविश्व

Amazon Layoffs : अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका; 18 हजार लोकांना मिळणार नारळ, नोटीस जारी!

2023 मध्ये अमेरिकेसह संपूर्ण जग मंदीच्या गर्तेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazonने पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना कामावरून काढू शकते.

विशेष बाब म्हणजे यावेळची कर्मचारी कपात आधीच्या कपातीपेक्षा मोठी असू शकते. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अॅमेझॉनमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचारी कपात सुरू आहे.

कंपनी 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार होती, पण आता हा आकडा 18,000 च्या पुढे जाऊ शकतो. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

अमेझॉनची वाढ अलीकडच्या काळात झपाट्याने कमी झाली आहे. अशा परिस्थितीत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकून कंपनी आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेतील सिएटल येथील कंपनीने नोव्हेंबर महिन्यात सुमारे 10,000 कामगारांना कामावरून काढून टाकण्याची तयारी केली होती.

यामध्ये रिटेल, एचआर विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने असेही सांगितले होते की, कोरोना महामारीच्या काळात कंपनीने अनेक नवीन लोकांना कामावर घेतले होते.

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

2022 मध्ये, नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, Amazon ने जगभरात सुमारे 1.6 दशलक्ष लोकांना रोजगार दिला.

जर एकूण 18,000 कर्मचार्‍यांनी आपली नोकरी गमावली तर ती कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांच्या 12 टक्के असेल. ज्या कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल त्यांना 24 तासांची नोटीस आणि वेतन दिले जाईल.

2023 मध्ये अमेरिकेसह संपूर्ण जग मंदीच्या गर्तेत आहे. अशा परिस्थितीत 2022 सालापासूनच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली होती. यामध्ये ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, फेसबुकची मूळ कंपनी मेटा अशा अनेक बड्या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Agriculture Loss By Rain : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश

Pune News : निधी येऊनही शहरात पाणी का साठते? केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडून प्रशासनाची झाडाझडती

SCROLL FOR NEXT