stock market sakal
अर्थविश्व

शेअर बाजाराचे अमृतमंथन

म्युच्युअल फंडांचे त्यावेळचे जगसुद्धा अगदी वेगळे होते.

सुहास राजदेरकर

गेल्या ७५ वर्षांमध्ये शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि एकूणच भांडवली बाजारामधील झालेले बदल आणि प्रगती ही अचंबित करणारी आणि अविश्वसनीय आहे. ७५ वर्षांपूर्वी, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला, त्यावेळेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, ‘निफ्टी’, ‘सेन्सेक्स’चा जन्मसुद्धा झाला नव्हता. त्यावेळचे भांडवली बाजाराचे जगच खूप वेगळे होते. आज ज्या संस्था आणि संकल्पना आपल्या रोजच्या परिचयाच्या झाल्या आहेत, त्या तेव्हा अस्तित्वात नव्हत्या. इंटरनेट, कॉम्प्युटर, मोबाईल, डी-मॅट, केवायसी हे तर सोडाच, पण टीव्ही-फोन सुद्धा अनेक वर्षे नव्हते. शेअर बाजारामधील कामकाज पूर्णपणे फिजिकल होते, ट्रेडिंग रिंग होती, शेअर सर्टिफिकेट होती, स्टॅम्प होते. शेअर ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गर्दी असायची. फसवणुकीचे प्रकारही सर्रास घडायचे. शेअरखरेदी केल्यानंतर ते स्वतःच्या नावावर व्हायला काही महिने लागायचे.

म्युच्युअल फंडांचे त्यावेळचे जगसुद्धा अगदी वेगळे होते. पूर्वी युनिट ट्रस्ट आॅफ इंडियाची अर्थात ‘युटीआय’ची मक्तेदारी होती. कॅशसुद्धा घेतली जायची. ‘युनिट-स्कीम ६४’ युनिट्स त्यावर्षीच्या सर्वांत कमी भावात मिळण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असायची. त्या दिवशी, ‘युटीआय’मधील काउंटरमध्ये नोटांच्या थप्प्यांचा मोठा डोंगर असायचा व पोलिस पहारा असायचा, हे मी तिथे काम करीत असल्याने स्वतः पाहिले आहे. निव्वळ मालमत्ता मूल्य अर्थात एनएव्ही ही बाजारातील मूल्यांकनानुसार न ठरविता ती परस्पर ठरायची. ‘युटीआय’च्या ‘मास्टर गेन’ आणि ‘मास्टर प्लस’ योजनांना प्रचंड प्रतिसाद होता.

त्यामुळे सर्टिफिकेटच्या नकला होऊन काही वेळेस फसवणूकही व्हायची. घराचे पत्ते बरोबर नसायचे, त्यामुळे सर्टिफिकेट परत जायची. परत आलेली ही सर्टिफिकेट ठेवायला रजिस्ट्रार ऑफिसचे दोन संपूर्ण मजले लागायचे. अशा सर्टिफिकेटची चोरी होऊन ती बाजारात विकली जायची. प्री-प्रिंटेड (सही केलेले कोरे) चेक असायचे. योजनेतून पैसे काढले, की चेक मिळायचे; ज्यावर फक्त नाव असायचे. असे हजारो चेक पोत्यात भरून रेल्वेने वाटपासाठी पाठविले जायचे. मोठ्या रकमेच्या चेकवर असलेल्या नावांची बँकेत बनावट खाती उघडून ते परस्पर वटविले जायचे. पण आता हा सर्व इतिहास झाला...

आताच्या तरुण पिढीला हे सर्व सांगायला गेले तर ते आपल्याकडे विचित्र नजरेने पाहतील. त्याचप्रमाणे ४० वर्षांपूर्वी जर कोणी सांगितले असते, की तुम्ही घरबसल्या १० सेकंदात शेअरची खरेदी-विक्री करू शकाल, तरी लोकांनी त्याला वेड्यात काढले असते. आज आपल्या देशामध्ये दोन मोठे शेअर बाजार, कमोडिटी बाजार, दोन मोठ्या डिपॉझिटरी, ६००० लिस्टेड शेअर, १० कोटी डी-मॅट खाती, शेअर बाजाराचे ३.५० ट्रिलियन डॉलर इतके प्रचंड बाजारभांडवल, ५७,००० डीपी सर्व्हिस सेंटर, २००० शहरांमध्ये कार्यरत डीपी, ४५ म्युच्युअल फंड, त्यांच्या ३००० योजना, ३८ लाख कोटींची मालमत्ता, १० कोटी गुंतवणूकदार इतका प्रचंड मोठा असा कारभार आहे, ज्यामुळे कोट्यवधी लोकांना रोजगार मिळतो आहे.

बाजारावर याआधी अनेक वेळा इतके आघात झाले, की बहुतेकांना वाटले की आता शेअर बाजार सावरणे शक्यच नाही. मग तो हर्षद मेहता गैरव्यवहार असो, केतन पारेख गैरव्यवहार, डॉट-कॉम बबल, वाय टू के, सब प्राईम असो, का अगदी अलीकडचा कोरोना असो. या सर्वांवर मात करून शेअर बाजाराची घोडदौड सुरूच राहिली.

मागील ७५ वर्षांतील वेगवान प्रगतीमुळे आज जर कोणी विचारले, की पुढील २५ वर्षांमध्ये काय होईल, तर आज त्याचे भविष्य वर्तविणे खूप अवघड आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे झालेली क्रांती ही पुढे आणखी काय बदल घडवेल हे सांगता येत नाही. बहुतेक तज्ज्ञांनी २०२७ पर्यंत ‘सेन्सेक्स’ १,००,००० अंशांचा टप्पा पार करेल, असे भाकीत वर्तविले आहे. पाहूया, शेअर बाजाराच्या या मंथनातून काय काय बाहेर पडते ते!

(लेखक भांडवली बाजाराचेअभ्यासक-विश्लेषक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT