अर्थविश्व

मेहुल चोक्सीचे अॅंटिग्वाचे नागरिकत्व रद्द होणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारताचा फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सीचे भारत सरकारकडे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. भारताकडून वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अॅंटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉऊनी यांनी मेहूल चोक्सीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर ही शक्यता बळावली आहे. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करून त्याला भारत सरकारच्या हवाली करता येऊ शकेल कारण त्याचे सर्व कायदेशीर मार्ग आता संपले आहेत, असे ब्रॉऊनी यांनी म्हटले आहे. अॅंटिग्वा हा एक छोटासा कॅरिबियन देश आहे.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोक्सी हे पंजाब नॅशनल बॅंकेला 13,400 कोटी रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणाचे मुख्य आरोपी आहेत. नीरव मोदी सध्या लंडनच्या जेलमध्ये आहे. तर 60 वर्षांचा मेहूल चोक्सीने अॅंटिग्वा देशाचे नागरिकत्व घेतले आहे. सक्त वसूली संचालनालय आणि सीबीआय या दोन्ही यंत्रणांना मेहूल चोक्सी आणि नीरव मोदी या दोघांना ताब्यात घ्यायचे आहे.

मेहूल चोक्सीला जरी अॅंटिग्वाचे नागरिकत्व देण्यात आले असले तरी त्याचे नागरिकत्व रद्द होऊन त्याची भारतात रवानगी होऊ शकते ही शक्यता ब्रॉऊनी यांनी वर्तवली आहे. आम्ही मेहूल चोक्सीसारख्या आर्थिक गुन्हेगारांना पाठीशी घालत नसल्याचे तसेच आमच्या देशात या गोष्टींना थारा नसल्याचेही पंतप्रधान ब्रॉऊनी यांनी म्हटले आहे. त्याचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रविष्ट आहे. इतर कोणत्याही गुन्हेगाराप्रमाणेच त्याचेही मूलभूत अधिकार आहेत. न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडण्याचा मेहूल चोक्सीलाही अधिकार आहे. मात्र सर्व कायदेशीर मार्ग बंद झाल्यावर आम्ही त्याचे भारतात प्रत्यार्पण करू अशी ग्वाही ब्रॉऊनी यांनी दिली आहे.  आपण वैद्यकीय उपचारांसाठी भारताबाहेर आल्याचे आणि आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण टाळल्याचा आपला हेतू नसल्याचे चोक्सीने म्हटले आहे. मी वैद्यकीयदृष्ट्या फिट झाल्यानंतर भारतात परतणार आहे, असेही चोक्सी म्हणाला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्याचीही तयारी दर्शवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2027: २०२७ च्या जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटीची मंजुरी; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया

एकही झाड तोडू नका! तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती, नाशिक महापालिकेला नोटीस

Latest Marathi News Live Update : गुन्हेगारी रिल्सवर पुणे पोलिसांचा दणका! ‘दो भाई, दोनो तबाही’ व्हिडिओप्रकरणी तरुणांवर कडक कारवाई

Panchang 13 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Sakal Vastu Plotting Expo : ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ आजपासून

SCROLL FOR NEXT