अर्थविश्व

फ्लिपकार्टने कर्मचाऱ्यांना केले मालामाल

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या कर्मचाऱ्यांना मालामाल केले आहे. कंपनीने एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्सअंतर्गत (ईएसओपी) कर्मचाऱ्यांकडे असलेले ६७० कोटी रुपयांचे शेअर्स परत घेतले असून, याचा तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. खासगी कंपनीकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी ‘ईएसओपी’ योजना आहे. स्टार्टअप कंपनीतील ही सर्वांत मोठी बायबॅक योजना आहे. 

फ्लिपकार्ट समूहाचे कर्मचारी ‘बायबॅक ऑफर’मध्ये सहभागी झाले असून, देशातील सर्वांत मोठ्या ‘ईएसओपी रिपर्चेज प्रोग्रॅममध्ये सहभागी झाले आहेत. ही बायबॅक ऑफर फ्लिपकार्ट, मिंत्रा, जबाँग आणि फोन-पेच्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. फ्लिपकार्टने कर्मचाऱ्यांना स्टॉक परत करण्याची आतापर्यंत पाचवी संधी देऊ केली आहे. 

‘कर्मचारी आमची ताकद असून, त्यांच्याशिवाय फ्लिपकार्ट ई-कॉमर्स क्षेत्रात वरच्या स्थानावर पोचली नसती. ‘ईएसओपी रिपर्चेज प्रोग्रॅम आम्ही कर्मचाऱ्यांना त्यांनी घेतलेली मेहनत आणि कठीण परिश्रम यासाठी आभार मानण्याचे माध्यम म्हणून राबवतो’, असे फ्लिपकार्टचे अध्यक्ष सचिन बन्सल आणि समूहाचे सीईओ बिन्नी बन्सल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

SCROLL FOR NEXT