Business-Cycle-Investing
Business-Cycle-Investing 
अर्थविश्व

‘बिझनेस सायकल इन्व्हेस्टिंग’

अजय लड्ढा

ज्याने २०१८ मध्ये गुंतवणूक केली असेल, त्यांना त्यांची गुंतवणूक जागतिक आर्थिक संकटातून सावरत झालेल्या विकासाशी जुळणारी दिसली असेल. यातून पुढे येणारा प्रश्न हाच, की बाजाराचे महत्त्वाचे वळण कोणीही व्यक्ती नेमकी कसे हेरू शकेल? अर्थव्यवस्थेच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणारा पोर्टफोलियो गुंतवणूकदार कसा तयार करू शकतील? अशा स्थितीत ‘बिझनेस सायकल इन्व्हेस्टिंग’चे तत्त्व हे अनेकांगाने उपयुक्त ठरते. 

वृद्धी, मंदी, उतार आणि उभारी आदी वेगवेगळ्या अवस्थांमध्ये शेअर बाजाराचे वर्तन वेगवेगळे असते. तथापि, व्यवसायाच्या चक्राला ओळखून आणि त्यावर आधारित गुंतवणुकीची चौकट स्वीकारली असेल तर रस्ता कसाही का असेना, त्याचा विचार न करता आपण नेहमीच तो सुकर करणाऱ्या निष्णात चालकाची भूमिका वठवू शकतो.

व्यवसायाच्या चक्रांची जाण  
‘बिझनेस सायकल’ अर्थात व्यवसाय चक्र हे जेव्हा घसरणीला असते, तेव्हा कंपन्या चिंताग्रस्त असतात आणि खर्चाचे निर्णय त्या पुढे ढकलत असतात. उत्पादन प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले जात नाहीत, खर्चात कपात केली जाते आणि भांडवली विस्तार थंडावलेला असतो. अशा अवस्थेत कर्मचारी कपात सुरू होते आणि कर्मचाऱ्यांचे वेतनमान आहे त्या पातळीवर स्थिरावलेले असते. त्या उलट व्यवसाय चक्र तेजीत असताना, उत्पादन प्रकल्प संपूर्ण क्षमतेने चालत असतात. व्यवसाय विस्तार सुरू असतो, कामगारांना एकापेक्षा अधिक नोकरीच्या संधी असतात, त्यांचे वेतनमान वाढत असते, ग्राहकांकडून गरजेच्या वस्तूंची दमदार खरेदी सुरू असते आणि मौजमजेसाठी सहलींवर ते जाताना दिसतात. 

गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या व्यवसाय चक्रांमधून मार्गक्रमण हे वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवरून वाट काढत प्रवास करण्यासारखेच असते. जेव्हा सारे काही सुरळित असते, तेव्हा गाडी वेगाने हाकून अंतर कापले जाते. मात्र, दाटीवाटीच्या मार्गावर गाडीचा वेग कमी करण्याशिवाय गत्यंतर नसते. 

जर सरलेले दशक हे शेअर गुंतवणुकीसाठी सकारात्मक राहिले असेल, तर विद्यमान दशक हे काहीसे वेगळे असेल. पुढील १० वर्षांत व्यापक आर्थिक वातावरणात बदल होऊ शकतात, हे पाहताना गुंतवणूकदारांना चपळता दाखविणे भाग ठरते. वाढती अस्थिरता ही अशा काळाची अद्वितीय ओळख बनते आणि एका ‘थीम’मधून दुसऱ्यात वेगाने फिरविला जाणारा निधीच अशा काळात विजेता बनून पुढे येतो. त्यामुळे वेगवेगळ्या ‘थीम’मधून सहजपणे विहरण्याची क्षमता असलेल्या योजनेत अशा वेळी गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरते. 

गुंतवणुकीचीअनोखी शैली 
पारंपरिक गुंतवणुकीचा मार्ग आणि ‘बिझनेस सायकल’ गुंतवणूक ही अनेक मार्गांनी वेगळी आहे. सरळ शब्दात सांगायचे, तर ‘बिझनेस सायकल’ गुंतवणुकीमध्ये पारंपरिक गुंतवणुकीच्या तुलनेत मागची बाजू दाखविणाऱ्या आरशापेक्षा ‘विंडशील्ड मिरर’ अर्थात वातरोधी आरसाच अधिक वापरात येत असतो. पारंपरिक गुंतवणूक करण्याची शैली ही दीर्घकालीन सरासरी पीई, पीबी यासारख्या ऐतिहासिक तपशिलांवर अवलंबून असतात. ऐतिहासिक परतावा, अग्रगण्य निर्देशांकांच्या तुलनेत लाभांश उत्पन्नाचे ‘ट्रॅक रेकॉर्ड’ आणि त्या श्रेणीतील गुंतवणुकीचा प्रवाह पाहिला जातो. ‘बिझनेस सायकल’ गुंतवणुकीत आगामी संकेतांवर; जसे की अर्थव्यवस्थेच्या उभारीचे संकेत, भविष्यातील मिळकतीची शक्यता, भविष्यातील बाजार हिश्शातील वाढ आणि भविष्यातील होऊ घातलेले प्रकल्प यावर भर दिला जातो.

(लेखक आॅटस वेल्थ प्रा. लि.चे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT