the-new-buffettology 
अर्थविश्व

‘द न्यू बफेटॉलॉजी’ 

अतुल सुळे

मेरी बफे व डेव्हिड क्लर्क यांचे ‘बफेटॉलॉजी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले, तेव्हा अमेरिकेतील शेअर बाजारात ‘बुल रन’ चालू होता. नंतर चारच वर्षांत ‘डॉट कॉम’ कंपन्यांचा बुडबुडा फुटला व अनेक गुंतवणूकदारांचे खूप नुकसान झाले. गुंतवणूकदार संभ्रमित झाले असतानाच २००२ मध्ये त्याच लेखकांचे ‘द न्यू बफेटॉलॉजी’ हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी कमीत कमी जोखीम पत्करून चांगला परतावा कमाविण्याचे वॉरन बफे यांचे तंत्र अधिक  सुस्पष्ट केले. 

वॉरन बफे यांची गुंतवणुकीसाठी कंपनी निवडतानाची ‘चेकलिस्ट’  अशी :
कंपनी भागधारकांच्या भांडवलावर सातत्याने १२ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळवते का?
कंपनी एकूण भांडवलावर (दीर्घ मुदतीची कर्जे धरून) सातत्याने १२ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परतावा मिळवते का?
कंपनीचे ‘अर्निंग पर शेअर’ चांगले व वाढते आहेत का?
कंपनीची दीर्घ मुदतीची कर्जे ही सध्याच्या नफ्यापेक्षा पाच पटीच्या आत आहेत का?
कंपनीचा ब्रँड प्रसिद्ध अथवा सेवा अपर्यायी आहेत का?
कंपनीतील कामगार संघटित आहेत का?
कंपनीचे नफ्याचे मार्जिन सातत्याने चांगले आहे का?
कंपनीला सतत भांडवली खर्च करावाच लागतो का?
कंपनी सातत्याने ‘बायबॅक’ म्हणजेच स्वतःचे शेअर स्वतः खरेदी करीत असते का?
कंपनी जो नफा आपल्याच व्यवसायात गुंतवत आहे, त्यामुळे कंपनीच्या शेअरचा भाव वाढतो आहे का?
वरील गोष्टी तपासून पाहण्यासाठी वॉरन बफे प्रत्येक कंपनीच्या गेल्या दहा वर्षांच्या ‘फिनान्शियल स्टेटमेंट’चा अभ्यास करतात व पुढील दहा वर्षांनी शेअरचा भाव काय असेल, याचा 
अंदाज बांधतात.
हे उत्कृष्ट पुस्तक प्रत्येक गुंतवणूकदाराने अभ्यासावे असेच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT