Withdraw Money from ATM Using UPI App esakal
अर्थविश्व

आता ATM कार्डची गरज नाही; UPI अ‍ॅपवरद्वारेच काढा मशीनमधून पैसे

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑटोमेटेड टेलर मशीन्स (automated teller machines) अर्थात एटीएम मशीन्स बनवणाऱ्या एनसीआर कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे. त्यांनी याबाबत सांगितलंय की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मवर आधारित पहिलं इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश-विथड्रॉल (ICCW) सोल्यूशन त्यांनी लॉन्च केलंय. एटीएम कार्डशिवाय आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे मोबाईल वापरून BHIM, Paytm, GPay इत्यादी कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे रोख रक्कम काढता येणार आहे. (Withdraw Money from ATM Using UPI App)

सिटी युनियन बँकेने ही नवीन सुविधा वापरात आणण्यासाठी एनसीआरशी हातमिळवणी केलीये, असंही सांगण्यात आलंय. बँकेने क्यूआर कोड-आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेला अनुमती देण्यासाठी आपले 1,500 एटीएम याआधीच अपग्रेड केले आहेत. कोणत्याही एटीएमवर मोबाइल फोनवर UPI अ‍ॅप वापरण्यासाठीचं हे एक पुढचे पाऊल आहे. एटीएम कार्ड न वापरता याचा वापर होऊ शकतो, अशी माहिती एनसीआर कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे.

असा होईल सुविधेचा वापर

या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे मोबाईल वापरून BHIM, Paytm, GPay इत्यादी कोणत्याही UPI अॅपद्वारे रोख रक्कम काढता येणार आहे. यामध्ये ATM वापरताना कार्ड स्वाइप करण्याची किंवा बाळगण्याची गरज नाही. वापरकर्त्याने स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करणे आवश्यक आहे आणि त्याच्या किंवा तिच्या मोबाइल फोनद्वारे रोख पैसे काढण्याची परवानगी दिली की पैसे निघू शकतील. याप्रकारचे व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा QR कोड सतत बदलला जाईल. सध्या या प्रक्रियेतून पैसे काढण्याची मर्यादा ₹5,000 इतकी आहे. "हे UPI-आधारित असल्यामुळे त्याला कोणत्याही अतिरिक्त नियामक परवानगीची गरज नाहीये. कारण ही नवी सुविधा फक्त UPI अ‍ॅपचा विस्तार आहे असंही सांगण्यात आलंय.

सुविधा सुरक्षित आहे का?

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही सध्याची सर्वात सुरक्षित सुविधा आहे. दुसरे म्हणजे, ट्रॅक्शन डायनॅमिक QR कोडवर आधारित असल्याने, UPI अ‍ॅपशिवाय हा QR कोड कॉपी करण्याचा कोणताही मार्ग नाही. प्रत्येक व्यवहारामध्ये हा कोड बदलत राहणार आहे, म्हणून त्याला डायनॅमिक QR कोड म्हणतात, असंही सांगण्यात आलंय. या डायनॅमिक क्यूआर कोड-आधारित इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधा अपग्रेड केली असेल तर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT