Warren Buffett Sakal
अर्थविश्व

‘अर्थ’बोध : वॉरन बफे - मास्टर ऑफ द मार्केट

‘वॉल स्ट्रीट रीडर’चे संपादक जे स्टीली यांचे हे पुस्तक, गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांचा अगदी बालपणापासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करते.

अतुल सुळे

‘वॉल स्ट्रीट रीडर’चे संपादक जे स्टीली यांचे हे पुस्तक, गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांचा अगदी बालपणापासून ते अब्जाधीश होण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करते. जिलेट, वॉशिंग्टन पोस्ट, कोकाकोला, सॉलोमन ब्रदर्स आदी कंपन्यातील मोठा हिस्सा त्यांनी का व कधी खरेदी केला, याचे विश्लेषण सुद्धा या पुस्तकात वाचायला मिळते. पुस्तकाच्या शेवटी लेखकाने गुंतवणुकीचे नऊ नियम सांगितले आहेत, ते असे -

  • कंपनीच्या ताळेबंदातील व नफा-तोटा पत्रकातील आकडे काय सांगतात, ते समजून घ्या.

  • ज्या कंपनीची वस्तू किंवा सेवा तुम्हाला समजते, आवडते त्याच कंपनीत गुंतवणूक करा.

  • कंपनीचे भवितव्य कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी भरपूर वाचन करा, फक्त कंपनीचीच नव्हे, तर कंपनीच्या स्पर्धकांची सुद्धा जास्तीत जास्त माहिती मिळवा.

  • कोणतेही शेअर खरेदी करताना पुरेसे ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ आहे की नाही, ते नीट तपासून पाहा.

  • यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी गुंतवणूक या विषयाबद्दल ‘फॅनॅटिक’ म्हणजे अतिउत्साही व्हावे लागते.

  • अति लोकप्रिय झालेले शेअर खरेदी करणे टाळा.

  • यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ ही गुंतवणूक पद्धत आणि चक्रवाढवृद्धीची अदभूत ताकद नीट समजून घ्या.

  • गुंतवणूक करण्यासाठी मार्केट पडण्याची वाट पाहा, मग त्याला किती का वर्षे लागेनात!

  • एखादा शेअर खूप जण खरेदी करीत आहेत म्हणून खरेदी करणे टाळा, स्वतंत्ररित्या आणि जगावेगळा विचार करायला शिका.

वॉरन बफे यांच्या गुंतवणूक पद्धतीचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, शेकडो किलो पनीर जप्त

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT