अर्थविश्व

‘इंटेलिजंट इन्व्हेस्टर’

अतुल सुळे

‘सिक्युरिटी अॅनालिसिस' या व्यवसायाचे; तसेच ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ या गुंतवणूक पद्धतीचे जनक बेंजामिन ग्रॅहॅम यांच्या या पुस्तकाने गुंतवणूक क्षेत्रात अक्षर वाड़्मयाचा दर्जा प्राप्त केला आहे. हे पुस्तक १९४९ मध्ये प्रकाशित झाले असले तरी ग्रॅहॅम यांच्या शिष्यांनी दर पाच वर्षांनी ते अद्ययावत केले आहे. वॉरन बफे हे सुद्धा ग्रॅहॅम यांचे शिष्य! त्यांनी म्हटले आहे, की गुंतवणूक या विषयावर लिहिलेले ‘इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे.

बेंजामिन ग्रॅहॅम यांनी या पुस्तकाद्वारे ‘मिस्टर मार्केट’ हे अजरामर पात्र निर्माण केले आहे, ज्याची काही ठळक स्वभाव वैशिष्ट्ये अशी -

  1. कल्पना करा, की ‘मिस्टर मार्केट’ हा तुमच्या गुंतवणुकीच्या व्यवसायातील एक भागीदार आहे.

  2. याचे काम असे, की शेअर बाजारात नोंदणी झालेल्या सर्व शेअरचे भाव नित्यनियमाने सांगणे.

  3. दुर्दैवाने ‘मिस्टर मार्केट’ला एक कधीही बरा न होणारा आजार जडलेला आहे! त्याचे बिचाऱ्याचे मन स्थिर नसून, कधी अतिउत्साह, तर कधी अतिनैराश्य या दोन टोकांमध्ये ते लंबकासारखे झुलत असते.

  4. जेव्हा ‘मिस्टर मार्केट’ अति उत्साहात असतो (म्हणजे बाजारात तेजी असते), तेव्हा तो शेअरचे खूप चढे भाव सांगत असतो, तर जेव्हा तो नैराश्याच्या गर्तेत असतो (म्हणजे बाजारात मंदी असते), तेव्हा तो खूप कमी भाव सांगत असतो.

  5. आपण त्याच्याशी रोज व्यवहार केलाच पाहिजे, असे काही नसते. आपण त्याच्याकडे कितीही वेळा दुर्लक्ष केले तरी तो दुसऱ्या दिवशी परत हजर होतो.

  6. तुम्हाला शेअर बाजारातून पैसा कमवायचा असेल तर ‘मिस्टर मार्केट’ जेव्हा अतिउत्साहात असेल, तेव्हा तुमच्याकडील शेअर त्याला विका आणि तो जेव्हा खूप निराश असेल, तेव्हा त्याच्याकडून खरेदी करा.

  7. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, की ‘मिस्टर मार्केट’ हा तुमचा बॉस किंवा मार्गदर्शक नसून, तुमचा सेवक आहे, त्याच्याशी कधी व्यवहार करायचा ते तुम्ही ठरवायचे!

‘रोख्यांतील गुंतवणूक’ या विषयाचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी हे ६४० पानी पुस्तक जणूकाही पाठ्यपुस्तकच ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT