The Tao Of Warren Buffett Sakal
अर्थविश्व

‘अर्थ’बोध : ‘द ताओ ऑफ वॉरन बफे’

वॉरन बफे यांनी उच्चारलेले किंवा लिहिलेले प्रत्येक वाक्य अतिशय अर्थपूर्ण आणि गुंतवणूकदारांना मार्गदर्शक असते.

अतुल सुळे

बफेटॉलॉजी आणि न्यू बफेटॉलॉजी या दोन ‘बेस्ट सेलर्स’चे लेखकद्वय मेरी बफे आणि डेव्हिड क्लार्क यांनी ‘द ताओ ऑफ वॉरन बफे’ या पुस्तकांत गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांनी ठिकठिकाणी उच्चारलेल्या १२५ उदगारांचा संदर्भ आणि अर्थ वाचकांना समजावून सांगितला आहे. वॉरन बफे यांनी उच्चारलेले किंवा लिहिलेले प्रत्येक वाक्य अतिशय अर्थपूर्ण आणि गुंतवणूकदारांना मार्गदर्शक असते. त्यापैकी काही वाक्ये वानगीदाखल खाली देत आहे -

  • शेअर म्हणजे कागदाचे सर्टिफिकेट अथवा इलेक्ट्रॉनिक एंट्री नसून, एखाद्या व्यवसायाचा मालकी हक्क असतो.

  • अशा व्यवसायात गुंतवणूक करा, की जो एखादा मूर्ख माणूस सुद्धा चालवू शकेल; कारण भविष्यकाळात व्यवसाय एखाद्या मूर्खाच्या ताब्यात जाऊ शकतो.

  • कोणतीही गुंतवणूक करताना तुमच्यात एवढे धाडस आणि स्वतःवर विश्वास पाहिजे, की तुम्ही आपल्या ‘नेटवर्थ’च्या दहा टक्के हिस्सा गुंतवायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत.

  • आपण काय करतोय हे माहीत नसलेल्यांना एक वेळ परमेश्वर माफ करेल, पण शेअर बाजार कधीच माफ करीत नाही.

  • सामूहिक निर्णयाची माझी कल्पना म्हणजे आरशासमोर उभे राहणे म्हणजे स्वतंत्ररित्या आणि अभ्यासपूर्वक गुंतवणुकीचा निर्णय घ्या, आपला निर्णय योग्य आहे की नाही, याची दुसऱ्यांकडून खात्री करून घेऊ नका.

  • बेसबॉल खेळताना गोलंदाजाच्या हातात चेंडू असताना मी कधीच बॅट फिरवत नाही, म्हणजे तोट्यात असलेल्या कंपनीत मी कधीच गुंतवणूक करीत नाही.

  • शेअर बाजारातील मध्यस्थ तुम्हाला सतत खरेदी-विक्री करायला लावून पैसा कमवतात, तर खरा गुंतवणूकदार बाजारात निष्क्रिय बनूनच पैसा कमवू शकतो.

चिनी तत्ववेत्ता लाओत्सु याच्या वाक्यांप्रमाणेच गुंतवणूक गुरु वॉरन बफे यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्यसुद्धा साधे; परंतु प्रभावकारी असते, याची प्रचिती हे पुस्तक वाचताना आपल्याला वारंवार येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT