अर्थविश्व

‘अर्थ’बोध : ‘बॉगल ऑन म्युच्युअल फंड्स’

‘व्हॅनगार्ड’ ग्रुपचे संस्थापक जॉन बॉगल यांना ‘इंडेक्स फंडाचे जनक’ असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या हयातीत गुंतवणूक या विषयावर १० पुस्तके लिहिली व ती सर्व गाजली.

अतुल सुळे

‘व्हॅनगार्ड’ ग्रुपचे संस्थापक जॉन बॉगल यांना ‘इंडेक्स फंडाचे जनक’ असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या हयातीत गुंतवणूक या विषयावर १० पुस्तके लिहिली व ती सर्व गाजली.

‘व्हॅनगार्ड’ ग्रुपचे संस्थापक जॉन बॉगल यांना ‘इंडेक्स फंडाचे जनक’ असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या हयातीत गुंतवणूक या विषयावर १० पुस्तके लिहिली व ती सर्व गाजली. त्यापैकी ‘बॉगल ऑन म्युच्युअल फंड्स’ या पुस्तकात त्यांनी १२ मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत. त्यापैकी काही तत्वे अशी-

१) गुंतवणूक हा विषय दिसतो तितका अवघड नाही. तुम्हाला फक्त काही गोष्टी बरोबर करायच्या असतात आणि मोठ्या चुका टाळायच्या असतात.

२) जेव्हा गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा त्यातील सर्वांत सोपा पर्याय निवडा.

३) स्टॉक इंडेक्स फंडात अर्धे पैसे व उरलेले अर्धे बाँड इंडेक्स फंडात गुंतवून बाजारातील चढ-उतारांकडे दुर्लक्ष करा.

४) ‘समय बडा बलवान’ हे नेहमी लक्षात ठेवा.

५) आपल्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी भरपूर वेळ दिला, तरच तुम्हाला चक्रवाढवृद्धीचा चमत्कार बघायला मिळेल.

६) तुम्ही जर अतिसुरक्षित गुंतवणुकीच्या मागे लागलात, तर परतावा कमी मिळणार, त्यामुळे दीर्घकाळात उत्तम परतावा मिळविण्यासाठी थोडाफार धोका पत्करावाच लागतो.

७) एखाद्या शेअरमध्ये किंवा बाँडमध्ये सर्व किंवा मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा तुमची गुंतवणूक विभागून ठेवल्यास जोखीम कमी होते.

८) कोणतीही गुंतवणूक करताना परतावा, जोखीम आणि गुंतवणुकीचा खर्च यांचा नेहमी विचार करा.

९) ‘मिन रिव्हर्सल’चा नियम नीट समजून घ्या. एखाद्या वर्षी तुम्हाला खूप चांगला परतावा मिळाला तर तो पुढील वर्षी कमी होऊ शकतो व एखाद्या वर्षी कमी परतावा मिळाला तर नंतर तो वाढून सरासरी परतावा वाजवी होतो.

१०) एकदा विचारपूर्वक निवडलेल्या मार्गापासून कधीही विचलित होऊ नका- स्टे द कोर्स!

विसाव्या शतकातील एका प्रख्यात गुंतवणूकगुरुंनी सांगितलेली गुंतवणुकीची मार्गदर्शक तत्वे नीट समजून घ्यायची असतील, तर जॉन बॉगल यांचे हे पुस्तक जरूर वाचावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: तिन्ही पवारांचा एकत्रित फोटो बघून तटकरे काय म्हणाले? रोहित पवारांना जुन्या भूमिकांची करुन दिली आठवण

Yeola Bus Accident : येवल्यात पुणे-धुळे बसचा थरार! ब्रेक फेल झाल्याने एसटी थेट दुकानात घुसली, २ जखमी

बड्या बॉलिवूड अभिनेत्यांना टक्कर देणारा कलाकार 30 वर्षं आहे बेपत्ता ; कोण आहे तो ?

ZP Elections 2026 Voting Live Update : कल्याण रेल्वे स्टेशनवर तांत्रिक बिघाडाने लोकल सेवा विस्कळीत

Rohit Sharma: इतिहास बदलण्याची वेळ आलीय! T20 वर्ल्ड कपपूर्वी 'हिटमॅन' टीम इंडियाबद्दल काय म्हणाला? वाचा

SCROLL FOR NEXT