AUM of mutual funds up 4% at ₹25.47-lakh crore 
अर्थविश्व

म्युच्युअल फंड गंगाजळी 25.48 लाख कोटींवर !

वृत्तसंस्था

मुंबई:  म्युच्युअल फंडात ऑगस्ट महिन्यात 1.03 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर देशातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक ऑगस्टअखेर 3.8 टक्क्यांनी वाढून 25.48 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत म्युच्युअल फंडात 207.26 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. म्युच्युअल फंडातील एकूण फोलिओंच्या संख्येत 0.6 टक्क्यांची वाढ होऊन ते 8.528 कोटींवर पोचले आहेत. जुलैअखेर हीच संख्या 8.48 कोटी इतकी होती.

इन्कम, डेट प्रकारातील योजनांमधील गुंतवणूक ऑगस्टमध्ये 7.9 टक्क्यांनी (96,707 कोटी रुपये) वाढून 13.21 लाख कोटी रुपयांवर पोचली. ग्रोथ किंवा इक्विटी प्रकारातील योजनांमध्ये 9,090 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. इक्विटीतील एकूण गुंतवणूक आता 33,965 कोटी रुपयांवर पोचली आहे. ऑगस्टअखेर इक्विटी प्रकारातील फोलिओंची संख्या 0.7 टक्क्यांनी वाढून 6.16 कोटींवर पोचली आहे. हायब्रीड फंडात मागील महिन्यात 793 कोटी रुपयांची गुंतवणूक होत एकूण गुंतवणूक 12,853 कोटी रुपये झाली आहे. हायब्रीड फंडातील फोलिओंची संख्यासुद्धा 96.59 लाखांवर पोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी अखेर निर्दोष, अमित शहा मानहानी प्रकरणात सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लेटमार्क! मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत, लोकलचा १५-२० मिनिटं खोळंबा

Ashirvad Sooryavanshi Century: १९ चौकार, ६ षटकार... ११९ चेंडूंत १६८ धावा! वैभव सूर्यवंशीच्या भावाने गाजवले मैदान Video

राष्ट्रपती भवनाजवळ नॉर्थ ब्लॉकमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी

Pune News: पुणेकरांना दिलासा! जीपीएस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त; रखडलेल्या जमीन मोजण्या पुन्हा सुरू होणार

SCROLL FOR NEXT