Axis Bank 
अर्थविश्व

आता अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स घेणे योग्य ठरेल?

बँकेच्या एनआयएमनेही 12 तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली आहे.

शिल्पा गुजर

बँकेच्या एनआयएमनेही 12 तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली आहे.

दुसऱ्या तिमाहीत अ‍ॅक्सिस बँकेच्या नफ्यात 86 टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्याजातून मिळणारी कमाई 8 टक्क्यांनी वाढली, पण 14 तिमाहीत सर्वात कमी राहिली. बँकेच्या एनआयएमनेही 12 तिमाहीतील नीचांकी पातळी गाठली आहे. तर अ‍ॅक्सिस बँकेचा एडीआर 1.5 टक्क्यांनी घसरला होता. निकालानंतर जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

सीएलएसएचे (CLSA) मत

CLSA ने अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्ससाठी 1080 रुपयांचे टारगेट दिले आहे. बँकेची ऍसेट क्वालिटी अतिशय मजबूत राहिली पण PPoP Estimates 2-4 टक्क्यांनी कमी झाला. पण नफ्याचा अंदाज मात्र कायम ठेवला आहे. कर्ज आणि PPoP Growth बाबतीत बँकेने आपल्या बरोबरच्या बँकांना मागे टाकले आहे.

मॉर्गन स्टॅनलेचे (MORGAN STANLEY) मत

मॉर्गन स्टॅनलेने अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअरवर ओव्हरवेट रेटिंग दिले आहे आणि टारगेट 1000 रुपये ठेवले आहे. बँकेच्या ऍसेट क्वालिटी मजबूत असून स्लिपेज/क्रेडिट खर्च कमी राहिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. Lower PPoP मुळे, नफा अपेक्षेपेक्षा कमी झाला. त्यांनी नजीकच्या काळासाठी त्याचे PPoP कमी केले आहे. पण येत्या 2-3 वर्षांत त्यात सुधारणा होऊ शकते.

जेफरीजचे (JEFFERIES) मत

जेफरीजनेही (JEFFERIES)अॅक्सिस बँकेला बाय रेटिंग (Buy Rating)आहे आणि स्टॉकसाठी 910 ते 1020 रुपयांचे टारगेट दिले आहे. ते कमी क्रेडिट खर्चामुळे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले होते असे जेफरीजचे म्हणणे आहे. स्लिपेजमध्ये मॉडरेशन आणि Low Restructuring बँकेसाठी सकारात्मक आहे. बँकेच्या Net Interest Margin घट झाली आहे तर NII ग्रोथ 8 टक्के राहिली. बँकेची NIM त्यांच्या बरोबरीच्या बँकांपेक्षा कमकुवत राहिली आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी वेळ लागू शकतो असे जेफरीजचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT