Axis Bank sakal
अर्थविश्व

Axis Bank : ऍक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये चार महिन्यात 49% रिटर्न, तेजीचा कल

ऍक्सिसचे बँकेचे शेअर्स 1195 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 35 टक्के जास्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

ऍक्सिस बँकेच्या (Axis Bank) शेअर्सने मागच्या 4 महिन्यांत गुंतवणूकदारांना तब्बल 49 टक्के परतावा दिला आहे. तरीही त्याचे शेअर्स सध्या तीन टक्क्यांच्या सवलतीत आहेत. त्यामुळेच आता या शेअर्समध्ये गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत.

ऍक्सिसचे बँकेचे शेअर्स 1195 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 35 टक्के जास्त आहे. शुक्रवारी ऍक्सिस बँकेचा शेअर 887.65 रुपयांवर बंद झाले. त्याची मार्केट कॅप 2,72,816.90 कोटी रुपये आहे.

गेल्या तीन वर्षांत, ऍक्सिस बँकेने तंत्रज्ञानामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे आणि तिच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मार्जिनवर दिसून येत आहे. ऍक्सिस बँकेची ही गुंतवणूक यापुढेही सुरू राहू शकते, शिवाय कंपनी नफा वाढवण्यावरही भर देत आहे. बँकेची ऍसेट क्वालिटी सुधारत आहे.

या सर्व बाबींचा विचार करून, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने ऍक्सिस बँकेला 1,195 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे. तर आयसीआयसीआय सिक्युरिटीजने 1130 रुपयांटे टारगेट निश्चित केलेआहे.

ऍक्सिस बँकेचा स्‍टँडअलोन प्रॉफीट सप्टेंबरच्या तिमाहीत 70 टक्क्यांनी वाढून 5,329.77 कोटी रुपयांवर पोहोचले.  त्याचे उत्पन्न देखील वार्षिक आधारावर 20,134 कोटी रुपयांवरून 24,180 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. व्याज उत्पन्न 24% ने वाढून 20,239 कोटी झाले आणि एनपीए 2.50% झाला आहे.

23 जून 2022 रोजी ऍक्सिस बँकेच्या शेअर्सची किंमत 618.10 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. मात्र, त्यानंतर शेअर्सची खरेदी वाढली आणि चार महिन्यांत 27 ऑक्टोबरला त्याची किंमत 919.95 रुपयांवर पोहोचली. हा 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. पण तरी सध्या हे शेअर्स 3.5 टक्क्यांच्या सवलतीवर मिळत आहेत

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT