Bajaj Auto share esakal
अर्थविश्व

Bajaj Auto : बजाजचा हा शेअर ठरला मल्टीबॅगर,आणखी 21% वाढ अपेक्षित

सुमारे 14 वर्षांमध्ये, त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशात 23 पट वाढ केली आहे. पुढे त्यात आणखी 21 टक्के वाढ होण्याची शक्यता शेअर मार्केट एक्सपर्टने व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bajaj Auto shares : बजाज ग्रुपची ऑटो कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ही गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे. सुमारे 14 वर्षांमध्ये, त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशात 23 पट वाढ केली आहे. पुढे त्यात आणखी 21 टक्के वाढ होण्याची शक्यता शेअर मार्केट एक्सपर्टने व्यक्त केली आहे.

देशातील दुसरी सर्वात मोठी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी दुचाकी कंपनी बजाज ऑटोने सप्टेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक 20 टक्क्यांनी वाढ नोंदवली असून ती 1,530.00 कोटी रुपये झाली आहे. त्याचा नफा तिमाही आधारावर 30 टक्क्यांनी वाढला आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 16 टक्क्यांनी वाढून 10,202.77 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, त्याचे ऑपरेटिंग मार्जिन सप्टेंबर तिमाहीत सुमारे 1.25 टक्क्यांनी वाढून 17.2 टक्के झाले.

5 डिसेंबर 2008 रोजी बजाज ऑटोचे शेअर्स 157.45 रुपयांवर होते, ते आता 3695.85 रुपये झाले आहेत. याचा अर्थ बजाज ऑटोने 14 वर्षांत गुंतवणूकदारांच्या पैशात 23 पट वाढ केली आहे. गेल्या वर्षी 20 डिसेंबर 2021 रोजी तो 3028.35 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता.

त्यानंतर खरेदी वाढली आणि यावर्षी 1 सप्टेंबर 2022 पर्यंत 36 टक्क्यांनी वाढत 4130.15 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. त्याचे शेअर्स सध्या या उच्चांकावरून सुमारे 10 टक्क्यांच्या सवलतीवर आहेत.

दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या देशांतर्गत विक्री आणि निर्यातीमुळे बजाज ऑटोसाठी सकारात्मक कल आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून ब्रोकरेज फर्मने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 4483 रुपयांच्या टार्गेट किमतीवर बाय रेटिंग दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT