Bank account
Bank account  google
अर्थविश्व

Bank account : बँक खात्यात शून्य रुपये असतील तरीही काढू शकता १० हजार रुपये

नमिता धुरी

मुंबई : देशात केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. जेणेकरून त्याचा लाभ गरजू लोकांपर्यंत पोहोचेल. केंद्र सरकारने सन 2014 मध्ये सुरू केलेली तीच प्रधानमंत्री जन धन योजना लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

जर तुम्ही प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत खाते उघडले नसेल तर ते लवकर उघडा. या योजनेंतर्गत बँक खाती शून्य शिल्लक वर उघडली जातात. या खात्यावर सरकार अनेक फायदे देते. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. यातील एक सुविधा म्हणजे ओव्हरड्राफ्ट. यामुळे तुम्ही गरज पडल्यास ओव्हरड्राफ्टमधून 10,000 हजार रुपये काढू शकता.

बँकेत खाते उघडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, असे अनेकदा दिसून येते. बँकेत खाते उघडण्यात खूप अडथळे येतात आणि अशा प्रकारची समस्या बर्‍याच गरीब लोकांना येते. त्यामुळे आजही ते लोक बँकेत खाते उघडू शकच नाहीत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सन 2014 मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री जन धन योजना लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

10 हजार रुपये असे मिळतील

खरं तर, प्रधानमंत्री जन धन योजना योजनेअंतर्गत, तुमच्या खात्यात बॅलन्स नसले तरीही, 10,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध असेल. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.

ईओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असावे. असे नसल्यास केवळ 2,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट होईल. या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.

अनेक सुविधा उपलब्ध

जन धन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे खातेही उघडता येते. या योजनेचे खाते उघडल्यानंतर तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण, 30 हजार रुपयांचे जीवन संरक्षण आणि ठेव रकमेवर व्याज मिळते.

यावर तुम्हाला 10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. यामध्ये तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. तेच जन धन योजना खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT