अर्थविश्व

बॅंक कर्मचाऱ्यांचा मंगळवारी संप 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसांचा संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र कर्मचाऱ्यांनी आता मंगळवारी (ता. 22) संपाची हाक दिली आहे. 

या संपाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. 14) मुंबईत आझाद मैदानात महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन आणि बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांच्या शेकडो सदस्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांवरील कामाचा तणाव आणि वेतनवाढ; तसेच विलीनीकरणाचे परिणाम आणि यातून होणारे खासगीकरण याला विरोध करण्यासाठी देशभरातील बॅंक कर्मचारी संप करतील, असे ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT