Bank Strike Sakal
अर्थविश्व

Bank Strike : ग्राहकांना बसणार मोठा फटका! 'या' दिवशी बँक कर्मचारी देशव्यापी संपावर

संपामुळे बँकेच्या व्यवहारावर मोठा परिणाम होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Bank Strike : या महिन्याच्या शेवटी बँकांच्या संपामुळे तुमच्या बँकांचे कामकाज ठप्प होऊ शकते. खरं तर, 30-31 जानेवारीला देशातील काही बँकिंग संघटनांनी संप पुकारला आहे.

बँक संघटनांनी जाहीर केलेल्या दोन दिवशीय संपाची स्थिती आज 27 जानेवारीला कळणार आहे. बँक युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील समेटाची दुसरी फेरी 27 जानेवारीला होणार आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी.एच. व्यंकटचलम यांनी सांगितले की, 30 आणि 31 जानेवारीला संप पुकारण्यात येणार आहे.

मंगळवारी मुंबईत उपमुख्य कामगार आयुक्तांच्या झालेल्या सामंजस्य बैठकीत बँक संघटनांच्या मागण्या सोडविण्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.

दुसरीकडे इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने म्हटले आहे की, ते 15 दिवसांच्या आत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) सोबत चर्चा करण्यास तयार आहे.

अर्थसंकल्पापूर्वी संपाची हाक :

27 जानेवारी रोजी सामंजस्य बैठकीची पुढील फेरी होणार असून त्यामुळे संपाची हाक कायम आहे. संप झाला तर तो अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी असेल.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) हा अनेक बँक युनियनचा समूह आहे. यापूर्वी विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

बँक युनियनच्या काय आहेत मागण्या :

कामाचे 5 दिवस असावेत, पेन्शनमध्ये बदल करणे, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) रद्द करणे, वेतन सुधारणा करणे आणि सर्व श्रेणीमध्ये पुरेशी भरती करणे यासह बँक युनियनच्या अनेक मागण्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT