Adani_RBI 
अर्थविश्व

RBI : अदानी ग्रुपच्या कथित घोटाळ्यानंतर बँकांची स्थिती कशी? RBIनं पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण

हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. तसेच अनेक बँकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. तसेच अनेक बँकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. यावरुन देशभरात बराच गदारोळ माजला आहे. यापार्श्वभूमीवर सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं भारतातील बँकांची स्थिती नेमकी कशी आहे? याबाबत पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. (Banking sector stable says RBI on banks exposure to Adani Group)

रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढलं असून याद्वारे जनतेला देशातील बँकांच्या सध्याच्या स्थितीबाबत भाष्य केलं आहे. आरबीआयनं म्हटलं की, काही बातम्यांमधून देशातील बँकिंग सेक्टरबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण आरबीआय या सर्व बँकांवर नियंत्रणं आणि आर्थिक स्थिरतेसाठी त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचं काम करत आहे.

"RBIकडं सेंट्रल रिपॉजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRILC) डेटाबेस सिस्टम आहे. ज्यामध्ये बँका त्यांच्या 5 कोटी आणि त्याहून अधिक ठेवींचा अहवाल देतात, ज्याचा वापर बँकांवर देखरेखीसाठी केला जातो असंही आरबीआयनं सांगितलं आहे.

बँकांची स्थिती सुदृढ

आरबीआयच्या ताज्या मुल्यांकनानुसार, भारतातील बँकिंग सेक्टर सध्या लवचिक आणि स्थिर आहे. बँकांबाबतचे भांडवल शिल्लक, मालमत्तेची गुणवत्ता, तरलता, तरतूद आणि नफा यासंबंधीचे विविध मापदंड सृदृध स्थितीत आहेत. आरबीआयने जारी केलेल्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्क (LEF) मार्गदर्शक तत्त्वांचं देखील बँका पालन करत आहेत,” असंही मध्यवर्ती बँकेनं प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

मग काय करणार? गणपती विसर्जनावेळी चक्क साडी नेसून नदीत पोहली मराठमोळी गायिका; Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Ajintha ST Accident: अजिंठ्यात एसटी बसचा थरारक अपघात; ट्रेलरला मागून धडक, २० हून अधिक प्रवासी जखमी

Latest Marathi News Live Update : टीएमसीच्या पक्ष आणि चिन्हाबाबतचा वाद तीन महिन्यात निकाली काढण्याचे निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

SCROLL FOR NEXT