Bank Loan  Sakal
अर्थविश्व

Bank Loan : 'या' बँकेने दिला ग्राहकांना मोठा धक्का! दोन दिवसांनी महाग होणार कर्ज; जाणून घ्या नवे दर

आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 12 जानेवारी 2023 पासून लागू होतील.

सकाळ डिजिटल टीम

Bank Loan : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मंगळवारी आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँक ऑफ बडोदाने MCLR मध्ये 30 बेसिस पॉईंट्स म्हणजेच वेगवेगळ्या कालावधीसाठी 0.30 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

आता बँकेकडून कर्ज घेणे महाग होणार आहे. बँकेचे नवीन दर 12 जानेवारी 2023 पासून लागू होतील. BOB ने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

बँकेने सांगितले की, एमसीएलआर दर 35 बेस पॉइंट्सने 7.85 टक्क्यांनी वाढवला आहे, तर एक महिन्याचा कालावधी 20 बेस पॉइंट्सने 8.15 टक्क्यांनी वाढवला आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

तीन महिन्यांचा MCLR 8.05 टक्क्यांवरून 8.25 टक्के करण्यात आला आहे. BoB ने सांगितले की, सहा महिन्यांचा MCLR 8.15 टक्क्यांवरून 8.35 टक्के करण्यात आला आहे. नवीन दर एका वर्षाच्या कालावधीसाठी 8.20 टक्क्यांवरून 8.50 टक्के झाला आहे. MCLR वाढल्याने कॉर्पोरेट कर्जदारांवर परिणाम होईल.

दरमहा अधिक पैसे द्यावे लागतील :

MCLR वाढल्याने मुदत कर्जावरील EMI वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत MCLR वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका अहवालात म्हटले आहे की, भारताचे बँकिंग क्षेत्र 2021/22 मध्ये लवचिक राहिले आणि कर्जदारांना कर्जाच्या मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी ठेव दरात आणखी वाढ करावी लागेल.

7 डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच MCLR वाढवण्यास सुरुवात केली आहे.

MCLR म्हणजे काय?

MCLR ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत. MCLR मध्ये, बँकांसाठी कर्ज देण्यासाठी किमान व्याज दर निश्चित केला जातो. MCLR वाढल्यानंतर त्याचा थेट परिणाम ग्राहकांना देण्यात येणाऱ्या व्याजदरांवर होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT