share market google
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

व्यवहाराअंती सेन्सेक्स 712.46 अंकांच्या म्हणजेच 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 57570.25 वर बंद झाला.

शिल्पा गुजर

मुंबई : शेअर बाजारात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. चांगले जागतिक संकेत, मजबूत रुपयाची आणि जून तिमाहीचे चांगले निकाल यामुळे बाजाराला साकारात्मक वातावरण होते.

व्यवहाराअंती सेन्सेक्स 712.46 अंकांच्या म्हणजेच 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 57570.25 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 228.65 अंकांच्या म्हणजेच 1.35 टक्क्यांच्या वाढीसह 17158.25 वर बंद झाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

शुक्रवारची सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे निफ्टी 200-डीएमएच्या वर बंद झाल्याचे मेहता इक्विटीज लिमिटेडचे प्रशांत तापसी म्हणाले. सर्व मोमेंटम स्टॉक्सने चांगले परफॉर्म केले. शेवटी निफ्टी 8.73 टक्क्यांच्या वाढीसह जुलै महिना संपला.

निफ्टी 17000 च्या पातळीच्या वर बंद झाल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. तांत्रिक दृष्टीकोनातून विचार केल्यास एप्रिल-जून कालावधीतील घसरण 61.8 टक्के आहे आणि पुन्हा एकदा 200DMA ओलांडली आहे. आता जोपर्यंत निफ्टी 17000 च्या वर राहील तोपर्यंत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये 17300 च्या पातळीवर जाताना दिसेल.

सर्व मोठ्या इव्हेंट्स गेल्याने मार्केट आता कॉर्पोरेट निकालांवर आणि ऑटो सेल्स, पीएमआय नंबर आणि जीएसटी कलेक्शनवर फोकस करेल असे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले.

निफ्टी मजबूत असल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. त्यात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. ते त्याच्या शॉर्ट टर्म मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त आहे. जे चांगले संकेत आहेत. आरएसआयच्या वाढीसह तेजीचा क्रॉसओव्हर दिसत आहे. अशा स्थितीत बाजाराचा शॉर्ट टर्म कल पॉझिटीव्ह दिसतो. निफ्टीला खाली 16,800-16,775 वर सपोर्ट आहे तर वर 17400 वर रेझिस्टन्स दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

एसबीआय लाईफ (SBILIFE)

टाटा स्टील (TATASTEEL)

हिन्दाल्को (HINDALCO)

सन फार्मा (SUNPHARMA)

कोल इंडिया (COALINDIA)

डॉ. रेड्डी (DRREDDY)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

कोटक बँक (KOTAKBANK)

डिविस लॅब (DIVISLAB)

ऍक्सिस बँक (AXISBANK)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT