share market
share market google
अर्थविश्व

बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

शिल्पा गुजर

मुंबई : बुधवारी बाजार सलग पाचव्या दिवशी हलक्या वाढीसह बंद झाला. बुधवारी तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाने जागतिक बाजारावर वर्चस्व गाजवले. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 20.86 अंकांच्या म्हणजेच 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 58136.36 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 5.50 अंकांच्या म्हणजेच 0.03 टक्क्यांच्या मजबूतीसह 17345.50 च्या पातळीवर बंद झाला.

ग्लोबल इंडिकेटर्स बुल्सच्या बाजूने दिसले नाहीत असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या तणावामुळे बहुतांश आशियाई आणि पाश्चिमात्य देशातील बाजार दबावाखाली राहिले.

पण या दबावाला न जुमानता बुधवारी देशांतर्गत बाजार तुलनेने मजबूत असल्याचे दिसून आले. हेव्ही वेट शेअर्सची खरेदी, रुपया मजबूत होणे, यूएस ट्रेझरी यील्डमध्ये घसरण आणि एफआयआयची खरेदी यामुळे देशांतर्गत बाजाराला सपोर्ट मिळाला.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टी बुधवारी 17200-17400 च्या मर्यादित श्रेणीत फिरताना दिसल्याचे LKP सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. डेली चार्टवर निफ्टीवर अपट्रेंड चालू आहे. डेली RSI बुलिश क्रॉसओव्हरसह अपट्रेंड दाखवत आहे. जोपर्यंत निफ्टी 17000 च्या खाली राहील तोपर्यंत तो तेजीत राहील. वर, निफ्टीसाठी 17400-17500 वर रझिस्टंस आहे.


निफ्टी 17200 च्या वर राहील तोपर्यंत तो 17400-17450 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर निफ्टी 17200 च्या खाली घसरला तर ट्रेडर्सनी त्यांची लाँग पोझिशन कमी करावी कारण त्यानंतर निफ्टी 17150-17100 च्या दिशेने जाताना दिसतो असेही ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

एशियन पेंट्स (ASIANPAINTS)

एनटीपीसी (NTPC)

हिन्दुस्थान युनिलिव्हर (HINDUNILVR)

मारुती (MARUTI)

आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

ए यू बँक (AUBANK)

हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDUPETRO)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT