Share Market esakal
अर्थविश्व

Best Share : खूप कमी कालावधीत गुंतवणूकदार कोट्याधीश, कंपनीला द्यावे लागले चक्क स्पष्टीकरण...

या कंपनीचे शेअर्स इतक्या वेगाने वाढले की त्यांना याबाबात स्पष्टीकरण द्यावे लागले.

सकाळ डिजिटल टीम

स्टर्लिंग टूल्स (Sterling Tools) या हाई टेन्साइल कोल्ड फॉर्ज्ड फास्टनर्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स इतक्या वेगाने वाढले की त्यांना याबाबात स्पष्टीकरण द्यावे लागले. कारण या कंपनीने निव्वळ एका महिन्यात 42 टक्‍क्‍यांनी झेप घेतली आहे आणि अतिशय कमी काळात गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले. (Best Share Sterling Tools have given unexpected return share market)

शेअर्सच्या व्हॉल्यूममधील वाढ पूर्णपणे बाजारावर आधारित आहे आणि कंपनीचे त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे कंपनीने 10 जानेवारीला एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले. सध्या त्याचे शेअर्स चार वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर आहेत. शुक्रवारी 20 जानेवारीला बीएसईवर 11.77 टक्क्यांच्या वाढीसह ते 350 रुपयांवर ट्रेड करत होते.

12 सप्टेंबर 2003 रोजी स्टर्लिंग टूल्सचे शेअर्स केवळ 2.90 रुपयांना होते. आता ते 11971 टक्क्यांनी वाढून 350.05 रुपयांवर गेलेत, म्हणजेच 20 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 121 पटीने वाढून 1.21 कोटी रुपये झाले आहेत.

गेल्या वर्षी 12 मे 2022 रोजी स्टर्लिंग टूल्सचे शेअर्स 116.05 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांक आहे. मात्र त्यानंतर पुढील अवघ्या 8 महिन्यांत ते 213 टक्क्यांनी वाढत 362.90 रुपयांच्या चार वर्षांचा विक्रमी उच्चांक गाठला.

स्टर्लिंग टूल्स ही देशातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह फास्टनर कंपनी आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मोटर कंट्रोल युनिट (MCU) पुरवठा करणार्‍या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ही एक आहे. एमसीयू हा ईव्हीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यासाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मोटर कंट्रोल अल्गोरिदम आणि फर्मवेअर एक्सपर्टाइज कांबिनेशन आवश्यक आहे.

कंपनीसाठी ईव्ही व्यवसाय किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो की 17 टक्के कमाई ईव्ही विभागातून येते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT