Best Stock sakal
अर्थविश्व

Best Stock :10 रुपयांचा शेअर पोहोचला 3300 रुपयांवर, गुंतवणूकदारांचा आनंद गगनात मावेना

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना शुन्यातून कोट्यधीश बनवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना शुन्यातून कोट्यधीश बनवले आहे. शेअर बाजारात संयम महत्त्वाचा आहेच शिवाय शेअर्सची पारख असणेही तेवढेच गरजेचे आहे. असाच एक स्टॉक म्हणजे गरवारे टेक्निकल फायबर्स (Garware Technical Fibres) ज्याने गुंतवणूकदारांना केवळ 31 हजारांच्या गुंतवणुकीने कोट्यधीश बनवले. (Best Stock Garware Technical Fibres shares reach upto 3300 Rupees from 10 Rupees)

कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी मुकेश सुराणा यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्याचे शेअर्स घसरत होते. मात्र, आज बाजाराच्या कमकुवत स्थितीतही त्याचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. गरवारे टेक्निकल फायबर्सचे शेअर्स बीएसईवरर 3296 रुपयांवर बंद झाले. त्याची मार्केट कॅप 6,795.75 कोटी रुपये आहे.

गरवारे टेक्निकल फायबर्सच्या शेअरची किंमत 11 ऑगस्ट 2000 रोजी केवळ 10.05 रुपये होती. आता तो सुमारे 329 पटीने वाढून 3,296 रुपयांवर पोहोचला आहे. याचा अर्थ 22 वर्षात केवळ 31 हजारांच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले. 30 ऑगस्ट 2013 रोजी त्याचे शेअर्स 39.50 रुपयांवर ट्रेडिंग करत होते, याचा अर्थ 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 83 पटीने वाढ झाली आहे.

यावर्षी 16 मार्च 2022 रोजी 2611.20 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता. यानंतर गरवारे यांच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली. सहा महिन्यांत 12 सप्टेंबर 2022 रोजी तो जवळपास 44 टक्क्यांनी वाढून 3752.55 रुपयांवर पोहोचला. हा एक वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. पण शेअर्सवर पुन्हा दबाव आला आणि आता त्याचे भाव 12 टक्के सूटवर आहेत.

गरवारे टेक्निकल फायबर्स ही टेक्निकल टेक्सटाइल्स सेक्टरमधील आघाडीची कंपनी आहे. कंपनीने 1976 मध्ये आपला व्यवसाय सुरू केला आणि आता त्याचा व्यवसाय जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. हे उच्च दर्जाचे एक्वाकल्चर केज नेट्स, फिशिंग नेट्स, स्पोर्ट्स नेट्स, सेफ्टी नेट्स, ऍग्रीकल्चरल नेट्स, कोटेड फॅब्रिक्स, पॉलिमर रोप्स आणि जिओसिंथेटिक्स तयार करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT