Share Market Sakal
अर्थविश्व

Share Market : 'या' कंपनीने केले मालामाल! 21 वर्षात गुंतवणूकदार कोट्यधीश

या शेअर्सनी लाँग टर्ममध्ये त्यांंच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market : ऑटो पार्ट्स इक्विपमेंट दिग्गज कंपनी भारत सीट्सचे (Bharat Seats) शेअर्सने गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला याचे शेअर्स एक वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले.

तेव्हापासून आतापर्यंत यात सुमारे 17 टक्के घट झाली आहे. पण या शेअर्सनी लाँग टर्ममध्ये त्यांंच्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. भारत सीट्सने गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल 102 पटींनी वाढवली आणि त्यांना कोट्यधीश बनवले. कंपनीची मार्केट कॅप 298.14 कोटी रुपये आहे.

21 वर्षात गुंतवणूकदार कोट्यधीश :

28 ऑगस्ट 2001 रोजी भारत सीट्सचे शेअर्स फक्त 93 पैशांना मिळत होते. सध्या हे शेअर्स 94.95 रुपयांना मिळत आहेत. याचा अर्थ भारत सीट्सने 21 वर्षांत गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे 1.02 कोटी बनवले आहेत.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

भारत सीट्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केवळ लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही दमदार परतावा दिला आहे. यावर्षी 7 मार्च 2022 रोजी त्याची किंमत 63 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. तेव्हापासून, ते केवळ 9 महिन्यांत 83% ने मजबूत झाले आहे आणि 7 डिसेंबर 2022 रोजी 115 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर पोहोचले आहे.

भारत सीट्स हा मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि रोहित रेलन आणि असोसिएट्सचा (Rohit Relan and Associates) संयुक्त उपक्रम अर्थात जॉईंट व्हेंचर आहे. ही कंपनी चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी सीटिंग सिस्टम, कार्पेट्स, एनवीएच कंपोनंट्स आणि बॉडी सीलिंग पार्ट्स तयार करते. याशिवाय, ते रेल्वेसाठीही सीट्स तयार करते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT