Investment Sakal
अर्थविश्व

शेअर मार्केट : आता संधी ओळखून गुंतवणूक

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,३६२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,१५३ अंशांवर बंद झाले आहेत.

भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,३६२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,१५३ अंशांवर बंद झाले आहेत.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,३६२ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,१५३ अंशांवर बंद झाले आहेत. नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने २३३ अंशांची, तर ‘निफ्टी’ने ६९ अंशांची घसरण दर्शविली. सध्या ‘निफ्टी’चे किंमत उत्पादन गुणोत्तर (पीई) २२ अंशांवर, तर मार्केट कॅप टू जीडीपी रेशो (बफे इंडिकेटर) १०० अंशांच्या आसपास आहे. आलेखानुसार, आगामी कालावधीसाठी ‘निफ्टी’ची १५,६७१ ही महत्त्वाची आधार पातळी आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, भू-राजकीय तणाव, व्याजदरातील संभाव्य वाढ आदी अनेक कारणांमुळे सध्या बाजारात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता लक्षात घेता गुंतवणूकदारांनी संधी ओळखून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे आणि संयम ठेवणे योग्य ठरू शकेल.

पीआय इंडस्ट्रीजकडे लक्ष (शुक्रवारचा बंद भाव रु. २७९५)

पीआय इंडस्ट्रीज लि. ही कृषी-रसायन क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री आणि निर्यात दोन्ही बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थिती आहे. कंपनीकडे रसायनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे, जे जगभरातील शेतात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कंपनीच्या उदयपूर येथील संशोधन आणि विकास केंद्रात ३०० हून अधिक शास्त्रज्ञांची एक समर्पित टीम आहे. सध्‍या कंपनी महसुलाच्‍या सुमारे ७७ टक्के निर्यातीतून आणि उर्वरित २३ टक्के देशांतर्गत विक्रीतून कमावते. नऊ विभागीय कार्यालये, २८ डेपो, १५०० अनुभवी फील्ड फोर्स, दहा हजार सक्रिय डीलर वा वितरक आणि देशभरात पसरलेल्या एक लाखापेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांसह कंपनी एक विस्तृत वितरण नेटवर्क चालवते. कंपनीचे वितरण नेटवर्क भारतातील एक दशलक्षाहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचले आहे. व्यवसायात गुंतविलेल्या भांडवलावर ही कंपनी उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करीत आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेता, दीर्घावधीच्या दृष्टिकोनातून या कंपनीच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकेल.

डेल्टा कॉर्प तेजीचा कल (शुक्रवारचा बंद भाव - रु. ३२०)

डेल्टा कॉर्पोरेशन ही भारतातील एक मोठी गेमिंग कंपनी आहे. कॅसिनो गेममध्ये ही एक नोंदणीकृत कंपनी आहे. व्यवस्थापित कॅसिनो मार्केटमध्ये या कंपनीचा सर्वांत मोठा हिस्सा आहे. कंपनी गोवा, सिक्कीम आणि दमण येथे कॅसिनो चालवते. गेल्या वर्षी या कंपनीच्या शेअरचा भाव रु. १८८ च्या आसपास असताना आलेखानुसार तेजीचे संकेत मिळत असल्याबद्दल नमूद केले होते. सध्या मध्यम अवधीच्या आलेखानुसार, या कंपनीच्या शेअरने ऑक्टोबर २०२१ पासून रु. ३०८ ते रु. २४२ या मर्यादित पातळ्यांमध्ये चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात उलाढालीमध्ये सरासरीपेक्षा जास्त वाढ दर्शवत रु. ३२० ला बंद भाव देऊन तेजीचा कल दर्शविला आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव जोपर्यंत रु. २४० या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमधे चढ-उतार दर्शवत आणखी तेजी दर्शविणे अपेक्षित आहे. निर्देशांकाने; तसेच या कंपनीच्या शेअरने आगामी काळात तेजीची चाल दर्शविल्यास मर्यादित धोका स्वीकारून मध्यम अवधीसाठी ‘ट्रेडिंग’च्या दृष्टीने तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या, तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT