Bhushan Godbole writes share market Possibility and opportunity for interest rate hike sakal
अर्थविश्व

व्याजदरवाढीची शक्यता आणि संधी

अमेरिकी शेअर बाजारात घसरण

भूषण गोडबोले

या लेखातील माहिती अभ्यासाच्या; तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,१९७ अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,१७१ अंशांवर बंद झाले होते. नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने ७१४ अंशाची; तसेच ‘निफ्टी’ने २२० अंशांची घसरण दर्शविली. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने एकाच दिवसात तब्बल ९८१ अंशांची पडझड करून ३३,८११ अंशांवर बंद भाव दिला. महागाईला नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदरांबाबत टिप्पणी केल्याने; तसेच कंपन्यांची अपेक्षेपेक्षा निराशाजनक कामगिरी होत असल्याचे विश्लेषण मांडले गेल्याने अमेरिकी शेअर बाजारात घसरण झाली.

नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे या आठवड्याच्या प्रारंभी भारतीय शेअर बाजारांसाठीदेखील नकारात्मक संकेत मिळू शकतात. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘निफ्टी’ची १५,६७० ही महत्त्वाची आधार पातळी आहे. फंडामेंटल्सचा विचार करता, सध्या ‘निफ्टी’चे किंमत उत्पादन गुणोत्तर २२ च्या आसपास आहे, तर ‘मार्केट कॅप टू जीडीपी रेशो’ १०२ च्या आसपास आहे.

अवघड परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी; त्याचप्रमाणे अर्थचक्राला गती देण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर कमी ठेवण्याचे धोरण स्वीकारले. अशा वेळेस कंपन्यांच्या मिळकतीनुसार शेअर बाजाराचा परतावा बँकेतील अल्प व्याजदरांपेक्षा चढा दिसत असल्याने पूर्वीपेक्षा महाग झालेल्या शेअर बाजाराने देखील आणखी वाढ दर्शविली. तुलनात्मकदृष्ट्या शेअर बाजाराचा परतावा बँकेतील अल्प व्याजदरांपेक्षा चढा असल्याने शेअर बाजारात पैशाचा ओघ आला. मात्र, पुढील काळात महागाई दरात प्रमाणबाह्य वाढ होऊ लागल्यास; तसेच मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचे धोरण स्वीकारले, तर शेअर बाजारात केवळ व्याजदर कमी असल्याने होणाऱ्या वाढीवर मर्यादा येतील, हे यापूर्वी नमूद केले होते.

बाजारात घसरण झाल्यास...

व्याजदरवाढीमुळे बाजारात घसरण झाल्यास, केवळ भावनांच्या जोरावर चढ-उतार करणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घावधीमध्ये मिळकतीत उत्तम वाढ दर्शवू शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअरचा विचार करणे योग्य ठरू शकेल. ज्या कंपन्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकाव धरून प्रगती करू शकतात, कार्यरत क्षेत्रातील स्वतःचे स्थान बळकट करीत बाजारातील हिस्सा वाढता ठेवत प्रगती करू शकतात, व्यवसायातील होणाऱ्या बदलांना सामावून घेत भांडवलावर उत्तम परतावा मिळवत प्रगतीची चक्रे चालू ठेऊ शकतात, अशा कंपन्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, तसेच लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपन्यांच्या शेअरनी तिमाही निकाल जाहीर झाल्यावर घसरण दर्शविली आहे. आयटी क्षेत्राचा विचार करता, भारतातील कंपन्यांची क्षमता आणि तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त दरातील मनुष्यबळ; तसेच भविष्यातील व्यवसायविस्ताराची संधी लक्षात घेता, सध्या टीसीएस (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ३६१२) या कंपनीच्या शेअरचा दीर्घावधीसाठी जरूर विचार करता येईल.

टीसीएस’चा विचार करणे योग्य

टीसीएस ही टाटा समूहाचा एक प्रमुख भाग आहे. ही कंपनी जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना आयटी सेवा देत आहे. ही कंपनी वित्त, बँकिंग, विमा क्षेत्रातील कंपन्या, दूरसंचार आणि वाहतूक क्षेत्रातील अनेक कंपन्यांना आयटी सेवा देत आहे. आयटी क्षेत्रातील असंख्य सेवांसाठी कंपनीकडे प्लॅटफॉर्मची श्रेणी आहे. उदा. TCS BaNCS - BFSI सेवांसाठी समर्पित व्यासपीठ, TCS iON - शैक्षणिक संस्थांसाठी व्हर्च्युअल लर्निंग प्लॅटफॉर्म, इग्निओ- एंटरप्राइझ आयटी आणि व्यवसाय समाधानांसाठी अग्रगण्य संज्ञानात्मक ऑटोमेशन सॉफ्टवेअर, TCS ADD - औषध विकास आणि क्लिनिक चाचण्यांच्या डिजिटल परिवर्तनासाठी व्यासपीठ, TCS HOBS - सबस्क्रिप्शन आधारित सेवांसाठी प्लग अँड प्ले बिझनेस प्लॅटफॉर्म, TCS TwinX - एंटरप्राइझ निर्णयांना ऑप्टिमाइझ करण्यात मदत करण्यासाठी AI समर्थित प्रणाली, TCS Optumera - किरकोळ विक्रेत्यांना त्यांची जागा, मिश्रण आणि किंमत एकात्मिक पद्धतीने ऑप्टिमाइझ करण्यात मदत करते.

तुलनात्मकदृष्ट्या टीसीएस या कंपनीचा ॲट्रिशन रेट म्हणजेच कर्मचारी सोडण्याचे प्रमाण कमी आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने नमूद केल्यानुसार, सध्या कंपनी देत असलेल्या सेवांची मागणी मजबूत आहे. व्यवस्थापनाने सूचित केल्यानुसार, क्लायंटला खर्चाच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. मात्र, कंपन्यांसाठी तंत्रज्ञानाचा खर्च शेवटचा असतो आणि सध्या तंत्रज्ञानाचा खर्च हा कंपनीला भविष्याच्या दृष्टीने सक्षम करणारा उपाय म्हणून पाहिला जात आहे. टीसीएसने कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन गेल्या १० वर्षांत गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळविला आहे. कंपनीने गेल्या ५ ते १० वर्षांत विक्री; तसेच नफ्यात प्रतिवर्षी ८ ते १० टक्क्यांनी वाढ दर्शवत असताना, फ्री कॅश फ्लोमध्ये देखील प्रतिवर्षी १५ टक्यांनी वाढ दर्शविली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या टीसीएस या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी मर्यादित गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरू शकेल.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या; तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT