unorganized  
अर्थविश्व

Budget 2019: मोदी सरकारचा असंघटित कामगार, नोकरदारांसाठी मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे.  त्यामुळे करमुक्त ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढली आहे, अशी माहिती अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात दिली.   

आता संघटित क्षेत्रात काम करणारे कर्मचारी 20 लाख रुपयांच्या करमुक्त ग्रॅच्युइटीसाठी पात्र असतील. ग्रॅच्युइटी कायद्यानुसार सध्या कर्मचाऱ्यांना या लाभासाठी किमान पाच वर्षांची सेवा अनिवार्य आहे. याशिवाय ज्या संस्थेत, कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या किमान दहा असायला हवी. शिवाय नोकरदाराचा नोकरी दरम्यान मृत्यू झाल्यास भरपाई अडीच लाख रुपये देण्यात येत होती. ती आता अडीच लाखांहून वाढवून 6 लाख करण्यात आली आहे. तसेच ईपीएफओकडून कामगारांना 7 हजार बोनस मिळणार आहे. 

असंघटित कामगारांसाठी मोठा निर्णय 
असंघटीत कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. शिवाय असंघटीत कामगार क्षेत्रात  21 हजार पगार असलेल्यांना बोनस मिळणार आहे. गोयल म्हणाले की, कामगारांचे कल्याण हाच आमचा हेतू, औद्योगिक क्षेत्रात पाच वर्षांत शांतता निर्माण केली असून आमच्या योजनेचा 10 कोटी असंघटीत कामगारांना याचा लाभ होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT