Share Market News Updates esakal
अर्थविश्व

Share Market: शेअर बाजाराच्या गटांगळ्या; सेन्सेक्स 739 तर निफ्टी 208 अंकांनी कोसळला

चांगल्या सुरुवातीनंतरही दिवसअखेर शेअर बाजाराने गटांगळ्या खाल्ल्या.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Updates: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोसळत असलेला शेअर बाजार एक आठवड्यापासून सूर गवसला असं वाटतं आज मात्र शेअर बाजारानं पुन्हा गटांगळ्या खाल्ल्या. सकाळी सकारात्मक सुरुवातीनंतरही दिवसाच्या अखेरीस शेअर बाजाराच्या दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 709.17 अंकांनी म्हणजेच 1.26 टक्क्यांनी घसरून 55776.85 अंकांवर बंद झाला तर निफ्टी -208.30 अंकांनी म्हणजेच 1.23 टक्क्यांनी घसरून 16,663.00 अंकांवर बंद झाला. (Big Fall in Stock market; The Sensex fell by 739 points and the Nifty by 208 points)

दरम्यान आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी सलग सहाव्या दिवशी हिरव्या चिन्हात सुरु झाला होता. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 177.87 अंकांच्या वाढीसह 56663.87 वर सुरु झाला. दुसरीकडे, निफ्टी 29.25 अंकांच्या म्हणजेच 0.17 टक्क्यांच्या वाढीसह 16,900.65 वर सुरु झाला.

सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी सलग पाचव्या दिवशी हिरव्या चिन्हात बंद झाले. सेन्सेक्स 935.72 अंकांच्या म्हणजेच 1.68 टक्क्यांच्या वाढीसह 56,486.02 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 240.85 अंकांच्या म्हणजेच 1.45 टक्क्यांच्या वाढीसह 16,871.30 वर बंद झाला. सोमवारच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली, तर रियल्टी, फार्मा आणि मेटलमध्ये नफावसूली दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Weight Reduction : गॅस संकटाचा मोठा फटका ! घरगुती LPG सिलिंडर बाबत सरकारचा नवा निर्णय

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

SCROLL FOR NEXT