अर्थविश्व

अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे दोन दशकांतील सर्वांत मोठी घट होण्याची शक्‍यता

वृत्तसंस्था

मुंबई - चालू आर्थिक वर्षातील कंपनी कर आणि प्राप्तिकर संकलन मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. प्रत्यक्ष कर संकलनात मागील दोन दशकांतील सर्वांत मोठी घट चालू आर्थिक वर्षात होण्याची शक्‍यता आहे. अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे आणि कंपनी करात कपात केल्यामुळे कर संकलनात मोठीच घट होणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. 

कर विभागाने २३ जानेवारीअखेर फक्त ७.३ लाख कोटी रुपयांचाच कर वसूल केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत गोळा झालेल्या करापेक्षा हे प्रमाण ५.५ टक्‍क्‍यांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण ११.५ लाख कोटी रुपयांपेक्षाही कमी कर संकलन होण्याची शक्‍यता आहे. प्रत्यक्ष कराचा सरकारच्या वार्षिक उत्पन्नात जवळपास ८० टक्‍क्‍यांचा वाटा असतो. त्यामुळे सरकारला भांडवल उभारणीसाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात १३.५ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले होते. मागील आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत कर संकलनाचे उद्दिष्ट १७ टक्‍क्‍यांनी वाढवण्यात आले होते. मात्र देशांतर्गत बाजारपेठांमधील मागणीत घट झाल्याने कंपन्या आणि व्यावसायिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कंपन्यांना गुंतवणूक आणि नोकऱ्यांमध्ये कपात करावी लागत आहे.

या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन कर संकलन घटले आहे. देशाचा आर्थिक विकासदर चालू आर्थिक वर्षात ५ टक्केच राहणार असल्याचा अंदाज सरकारने याआधीच जाहीर केला आहे. मागील ११ वर्षांतील हा सर्वांत कमी विकासदर असणार आहे.

मुंबईत संकलनाला फटका 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रत्यक्ष कर संकलनात जानेवारीच्या मध्यापर्यंत १३ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. मागील दहा वर्षांत मुंबईतील प्रत्यक्ष कर संकलनात पहिल्यांदाच घसरण झाली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत मुंबईतील प्रत्यक्ष कर संकलनात दोन आकडी घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात करसंकलन ४ टक्‍क्‍यांनी घटले होते. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण करसंकलन २.२० लाख कोटी रुपये होते. मागील आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत मुंबईतील कर संकलन २.३० लाख कोटी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT