Stock market
Stock market 
अर्थविश्व

शेअर मार्केट कोसळलं जोरदार; गुंतवणूकदारांना आठ लाख कोटींचा फटका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर मार्केटची सुरुवात खराब झाली आहे. बीएसईचा सेन्सेक्स 287.16 च्या अंशांनी म्हणजेच 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 59,348.85 च्या स्तरावर उघडला. दुसरीकडे निफ्टी देखील घसरणीसह उघडला. दोन्हीही इंडेक्स लाल निशाण्यावर उघडल्यानंतर आज दिवसभरात देखील शेअर मार्केटमध्ये बरीच घसरण झालेली पहायला मिळाली. दिवसभराच्या चढउतारानंतर सेन्सेक्स आज 1170.12 अंशांनी म्हणजेच 1.96 टक्क्यांनी घसरला आहे. दुपारी बारा वाजल्यानंतरच सेन्सेक्समध्ये 890.65 अंशांची घसरण झाली होती.

आठ लाख कोटींचं नुकसान

आज सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली आहे. एप्रिलनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. तब्बल सात महिन्यांनंतर झालेल्या दैनंदिन उलाढालीमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये तब्बल 7.86 लाख कोटी रुपये गमावल्याचं आकडेवारी सांगते. सगळ्याच सेक्टर्समध्ये ही घसरण दिसून आली आहे.

आजच्या ट्रेडिंगमध्ये रिलायन्स, वोडाफोन आयडिया, एअरटेल, PVR, कोटक महिंद्रा बँक, Zomato, Nykaa, Paytm, Sapphire Foods, Cipla, Maruti, Asian Paints, IRCTC आणि कॅडिला हेल्थकेअर यांसारख्या शेअर्सवर लक्ष लक्ष होते. कृषी कायदे रद्द केल्यामुळे PSU स्टॉक्सवर परिणाम झाला आहे. तर O2C करारामुळे रिलायन्समध्येही जोरदार घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. जोरदार कामगिरी करणारा रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर सुध्दा 3 टक्क्यांनी घसरला आहे.

निफ्टी देखील कोसळला

लाल निशाण्यावर सुरु झालेल्या मार्केटमध्ये आज निफ्टीमध्येही घसरण झाली आहे. निफ्टीमधअये आज 348.25 अंशांची घसरण झाली आहे. म्हणजेच तब्बल 1.96 टक्क्यांची ही घसरण आहे. सध्या निफ्टी 17416.55 स्तरावर आहे. आज निफ्टी देखील मार्केटच्या सुरुवातीलाच कोसळलेला दिसून आला. सुरुवातीलाच 87.35 अंश वा 0.49 टक्क्यांनी घसरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT