Bill-Gates 
अर्थविश्व

अमेरिकेत दहा आठवड्यांचा "शट डाउन' करावा - बिल गेट्‌स 

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन -  कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी अमेरिकेत दहा आठवड्यांचा पूर्ण "शट डाउन' करावा, अशी मागणी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांनी केली आहे. 

अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर गेट्‌स यांनी हे मत व्यक्त केले आहे. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगूनदेखील काही राज्यांमध्ये पूर्णपणे "शट डाउन' करण्यात आलेले नाही. तिथे अजूनही काही रेस्टॉरंट आणि समुद्रकिनारे पर्यटकांसाठी खुले आहेत. एका मोठ्या संकटाला हे खुले आमंत्रणच आहे, असे मत गेट्‌स यांनी व्यक्त केले आहे. सध्या काही राज्यांमधून नागरिक इतरत्र प्रवास करत आहेत. कोरोनासुद्धा याच पद्धतीने सर्वत्र पसरू शकतो, असेही ते म्हणाले. 

कोरोना बाधितांची संख्या जोपर्यंत कमी होत तोपर्यंत सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले पाहिजेत. त्यासाठी दहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. 

सद्यःस्थितीत कोणत्याही प्रकारच्या गोंधळ किंवा गैरसमजामुळे अर्थव्यवस्थेला आणखी नुकसान होणारच आहे; मात्र कोरोनाचा संसर्ग पुन्हा पसरण्याची आणि आणखी मृत्यू वाढण्याची शक्‍यता आहे, असेही ते पुढे म्हणाले. 

कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. गेल्या महिनाभरात अमेरिकेतील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. न्यूयॉर्क हे कोरोनाचे नवे केंद्र बनले आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच कोरोनाबाबत अमेरिकी नागरिकांनी योग्य काळजी घेतली नाही तर एक ते अडीच लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

SCROLL FOR NEXT