बिटकॉइन sakal
अर्थविश्व

‘बिटकॉइन’ने टाकले ‘फेसबुक’ला मागे

‘बिटकॉइन’ने ‘मार्केट कॅपिटलायझेशन’च्या बाबतीत ‘फेसबुक’ला अलीकडेच मागे टाकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘बिटकॉइन’ने ‘मार्केट कॅपिटलायझेशन’च्या बाबतीत ‘फेसबुक’ला अलीकडेच मागे टाकले आहे. लेखनाच्या वेळी अंदाजे $ १,१४८,४६०,०३०,४४० हा आकडा होता. या वर्षाच्या सुरुवातीला किमतीत किरकोळ घट झाली असूनही, ‘बिटकॉइन’ वेगाने वाढत आहे. गेल्या वर्षी ‘बिटकॉइन’मध्ये ३६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर ‘फेसबुक’ फक्त २२ टक्क्यांनी वाढले आहे. हे लक्षात घेतले पाहिजे, की ही तुलना फेसबुक, सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध कॉर्पोरेशन आणि बिटकॉइन, आर्थिक मालमत्ता आणि विकेंद्रीकृत नेटवर्क यांच्यात आहे.

‘बिटकॉइन’ ही मागील दशकातील सर्वोत्तम कामगिरी करणारी मालमत्ता होती आणि या दशकाची जोरदार सुरुवात झाली आहे. या कॅलेंडर वर्षाच्या चौथ्या तिमाहीत प्रवेश करताना, ‘बिटकॉइन’ लक्षणीय वेग घेण्यास तयार आहे आणि आताच्या तुलनेत ते अधिक वाढेल. मागील काही चार्टचा अभ्यास करता कळून येते, की ‘बिटकॉइन’ चौथ्या तिमाहीत अनेकदा चांगली कामगिरी करतो.

‘बीटीसी’ची तुलना टॉप स्टॉकशी करताना, हे स्पष्ट होते, की बिटकॉइन हळूहळू यादीतील पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. ‘बिटकॉईन’ने ‘फेसबुक’ला मागे टाकत सध्या सहाव्या क्रमांकावर जागा पटकावली आहे. त्यानंतर गुगल, सौदी अरामको, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल हे मोठे स्टॉक आहेत.

आता २०२१ मध्ये ‘फेसबुक’ला त्याच्या स्थानापासून मागे टाकून असे दिसते, की बिटकॉइन या दशकासाठी देखील योग्य मार्गावर आहे. दुसरीकडे, कंपनीच्या तीन अॅपला सहा तासांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय झाल्यानंतर ‘फेसबुक’च्या मूल्यात पाच टक्क्यांची घट दिसून आली. या कारणास्तव सीईओ मार्क झुकेरबर्ग याची वैयक्तिक संपत्ती कमी झाली. कारण त्याने सुमारे सात अब्ज डॉलर गमावले, ज्यामुळे तो काही तासात ‘ब्लूमबर्ग’च्या अब्जाधीशांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला.

आता चौथ्या तिमाहीत बिटकॉइन आजच्या तुलनेत जास्त वाढण्यास तयार आहे. काही विश्लेषक असे सांगतात, की बिटकॉइन साधारणपणे वर्षाच्या चौथ्या तिमाहीत चांगली कामगिरी करतो या मागील काही वर्षातही हेच पाहायला मिळाले आहे.

सध्याचा तेजीतील बाजार २०२० च्या चौथ्या तिमाहीत सुरू झाला. अनेक लोक चौथ्या तिमाहीत विविध घटकांमुळे अधिक फायद्याची अपेक्षा करतात, जसे की मध्यवर्ती बँका पैशाचा पुरवठा वाढवतात किंवा एल साल्वाडोर यासारखे देश बिटकॉइनला वैध चलन म्हणून जाहीर करतात.

बिटकॉइनची आतापर्यंतची कामगरी बघता हे स्पष्ट आहे, की बिटकॉइन हळूहळू यादीतील पहिल्या क्रमांकाकडे चढत आहे. ‘फेसबुक’ला मागे टाकल्यावर आता ॲमेझॉन ‘मार्केट कॅप’च्या बाबतीत बिटकॉइनच्या अगदी समोर आहे

ॲमेझॉनच्या १.६३१ ट्रिलियन डॉलरच्या ‘मार्केट कॅप’ला मागे टाकणे, हा बराच मोठा पल्ला आहे. हे मूल्य ओलांडण्यासाठी, ‘बीटीसी’ला अंदाजे ५०-६० टक्के किंवा जास्त मिळणे आवश्यक आहे. तरी हळूहळू बिटकॉईन जगातील सर्वांत मौल्यवान मालमत्तेच्या या यादीत पुढे जाण्याची शक्यता दिसून येते.

-अमेय पवार

(लेखक क्रिप्टो नवोद्योजक आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT