sharemarket 
अर्थविश्व

coronavirus : शेअर बाजारात काळा सोमवार

पीटीआय

गुंतवणूकदारांनी गमावले 14.22 लाख कोटी रुपये 

मुंबई - कोरोना विषाणूमुळे शेअर बाजाराला ताप भरला असून, बाजार सोमवारी रुग्णशय्येवर पोचला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 3 हजार 935 रुपयांनी कोसळला. निर्देशांकात 2016 नंतर एकाच दिवसात झालेली ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. बाजारात आज झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांचे 14.22 लाख कोटी रुपये पाण्यात गेले. 

सेन्सेक्‍समध्ये आज 13.15 टक्के घसरण होऊन तो 25 हजार 985 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 1 हजार 135 म्हणजेच 12.98 टक्‍क्‍यांची घसरण होऊन 7 हजार 610 अंशांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांमध्ये 2016 नंतर एकाच दिवसात झालेली ही मोठी घसरण ठरली आहे. आज सकाळीच बाजार सुरू होताच पहिल्या तासात सेन्सेक्‍स 10 टक्के कोसळला. यामुळे लोअर सर्किट लागून व्यवहार 45 मिनिटे बंद ठेवण्यात आले. पुन्हा बाजार सुरू झाल्यानंतरही घसरण सुरूच राहिली. 

शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता रोखण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'ने घातलेले निर्बंध पुरेसे ठरलेले नाहीत. बाजारात खरेदीचा जोर नसल्याने तो कोसळला, अशी माहिती शेअर दलालांनी दिली. शेअर बाजारातून सुमारे दोन आठवड्यांत परकी गुंतवणूकदारांनी 50 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे काढून घेतले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने ते आणखी पैसे काढून घेण्याची भीती आहे. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल आज 116.09 लाख कोटी रुपयांवरून 102.13 लाख कोटी रुपयांवर आले. यामुळे गुंतवणूकदारांना आज 14 लाख कोटी रुपये गमवावे लागले. 

जगभरातील शेअर बाजार गडगडले 
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जगातील प्रमुख शेअर बाजारांतील पडझड सुरूच आहे. घसरणाऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ट्रिलियन डॉलरचे पॅकेज देण्यावर अमेरिकी संसदेत एकमत झालेले नाही. यामुळे आशियातील शेअर बाजारांना फटका बसला. याचबरोबर युरोपसह अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये सत्राच्या सुरुवातीला घसरणीचे वातावरण होते. 

शेअर बाजार - घसरण (आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
वेलिंग्टन - 9.3 
हॉंगकॉंग - 3.6 
सिडनी - 6 
शांघाय - 2.5 
तैवान - 2.8 
सिंगापूर - 7.5 
जकार्ता - 4 
सोल - 3.4 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT