Rupees 
अर्थविश्व

‘टेन कमांडमेंटस फॉर फिनान्शियल फ्रीडम’

अतुल सुळे

आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे, तुम्ही पैशासाठी काम करायचे थांबविता आणि पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो. हे स्वप्न बघणारे अनेक जण असले, तरी ते लवकरात लवकर प्रत्यक्षात आणणारे फारच थोडे! ‘टेन कमांडमेंटस फॉर फिनान्शियल फ्रीडम’ हे मेहराब इराणी यांचे पुस्तक आर्थिक नियोजनाद्वारे तुमचे आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्याचे स्वप्न ‘ऑटो पायलट’ मोडवर कसे टाकायचे, ते १० मार्गदर्शक सूचनांद्वारे शिकविते. मेहराब इराणी हे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर (इन्व्हेस्टमेंट) असून, त्यांना या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. 

या पुस्तकातील काही ठळक मुद्दे असे -
१. तुमच्या पोर्टफोलिओच्या परताव्यापैकी ९० टक्के परतावा ‘ॲसेट ॲलोकेशन’वर अवलंबून असतो.

२. ‘अर्न इन्कम’ व ‘पॅसिव्ह इन्कम’ म्हणजे काय ते समजून घ्या व आपल्या कमाईला महागाई, कर, व्याजदर आदींपासून वाचवा.

३. आपले ‘बजेट’ बनवा व त्यातून ‘सरप्लस’ निर्माण करा.

४. आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर टाळायच्या १३ चुका.

५. आपली संपत्ती वाढविण्यासाठी कर्जाचा वापर कसा करून घ्यावा, चांगले कर्ज व वाईट कर्ज यांतील फरक.

६. घर हे ‘ॲसेट’ आहे, की ‘लायबिलिटी’?

७. पैसा मिळवायचे, टिकवायचे आणि गुंतवणुकीद्वारे वाढविण्याचे १३ नियम.

८. समाजातून कमावलेली संपत्ती समाजाला परत करण्याचे महत्त्व.

आर्थिक नियोजनाद्वारे ‘आर्थिक निर्वाण’ कसे मिळवायचे हे समजावून सांगणारे हे पुस्तक निश्चितच मननीय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT