Britannia Industries Ltd esakal
अर्थविश्व

Britannia : ब्रिटानिया कंपनीनं केली मोठी डील; आता 'कॅनॅफ्रिक'मध्ये असणार केनियाची हिस्सेदारी

भारतातील सर्वात मोठी कुकी उत्पादक ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं केनियाच्या कॅनाफ्रिक बिस्किट लिमिटेडसोबत करार केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतातील सर्वात मोठी कुकी उत्पादक ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं केनियाच्या कॅनाफ्रिक बिस्किट लिमिटेडसोबत करार केला आहे.

भारतातील सर्वात मोठी कुकी उत्पादक ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं (Britannia Industries Ltd) केनियाच्या कॅनाफ्रिक बिस्किट लिमिटेडसोबत (Kenafric Industries) करार केला आहे. फूड कंपनीनं कॅटॅलिस्ट ब्रिटानिया ब्रँड्स लि. देखील विकत घेतलं आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं सोमवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत ही माहिती उघड झाली.

माहितीनुसार, कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या ब्रिटानिया आणि प्रायव्हेट कंपनी लिमिटेडनं (BADCO) Kenafric Biscuit Limited (KBL) मध्ये 51 टक्के कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला आहे. ब्रिटानियानं 13.87 कोटी केनियन शिलिंग्स (KES) म्हणजेच, 9.2 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.

केनियातील ब्रिटानिया फूड्स लि., खरेदी करण्यासाठी कंपनीनं नैरोबी-केनाफ्रिक इंडस्ट्रीजसोबत मिळून $20 दशलक्षचा करार केला. यामध्ये मालमत्ता आणि एका प्लांटचा समावेश आहे. केनाफ्रिकचे संचालक मिकुल शाह यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'ब्रिटानिया फूड्सशी संबंधित नसलेल्या ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं या भागीदारीमध्ये कंट्रोलिंग स्टेक घेतला आहे.'

केनाफ्रिकच्या म्हणण्यानुसार, नैरोबीमधील नूतनीकरण केलेला कारखाना या आठवड्यात सुरू होणार आहे. ब्रिटानिया ही 130 वर्षे जुनी कंपनी आहे, जिच्या ब्रँडमध्ये गुड डे आणि मेरी गोल्ड कुकीजचा समावेश आहे. याचा आफ्रिकेत प्रभाव वाढवण्याचा विचार सुरु असून तिथं त्यांचं उद्योग वाढवायचे आहेत आणि स्थानिक पातळीवर बनवल्या जाऊ शकणार्‍या उत्पादनांची आयात कमी करायची आहे.

ब्रिटानिया इंडस्ट्रीजसोबतच्या करारामुळं केनाफ्रिकला केनियाची दुसरी सर्वात मोठी बिस्किट उत्पादक बनण्यास मदत होईल, असं शाह म्हणालेत. कंपनीनं अलीकडंच इजिप्त आणि युगांडामध्ये पॅकिंग सुविधा स्थापित केल्या आहेत. तर, केनिया आणि नायजेरियामध्ये उपक्रमांचा विचार केला जात आहे. ब्लूमबर्गनं मार्चमध्ये हा अहवाल दिला. मात्र, ब्रिटानिया इंडस्ट्रीजनं केनिया कराराबद्दलच्या प्रश्नांना त्वरित उत्तर दिलेलं नाहीय. दरम्यान, ब्रिटानियानं अलीकडंच रजनीत कोहली यांची कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. रजनीत कोहली हे सीईओ वरुण बेरी यांची जागा घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Toll : कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण, पण 'या' ठिकाणी टोलनाका उभारणी अंतिम टप्प्यात!

CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

Pune Garbage Scam: कचरा माफियांचा पुण्यात डेरा? ७०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांकडून मुख्यसभेत प्रशासनाला घेराव

Latest Marathi News Live Update : शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Devsthan Inam Abolition: देवस्थान इनाम निर्मूलन कायदा मागे घ्या; अष्टविनायक मंदिरांचा एकमुखी इशारा, जमिनींच्या सुरक्षेसाठी संयुक्त लढ्याची घोषणा

SCROLL FOR NEXT