budget 2020 finance minister nirmala sitharaman gst new policy from april 
अर्थविश्व

Budget 2020 : जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण

वृत्तसंस्था

अर्थसंकल्प :
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवकरच वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) सुधारित आवृत्ती (व्हर्जन) येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा संसदेत केली. जीएसटी हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल आहे. जीएसटी गेल्या दोन वर्ष आव्हानांचा सामना करत आहे. मात्र जीएसटी परिषदेने चांगले काम केले असून आतापर्यंत ६० लाख नवीन करदात्यांची भर घातली आहे. तसेच, ४० कोटी व्यक्ती जीएसटी परतावा भरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीएसटीमधील कपातीचा ग्राहकांना फायदा झाला असून ग्राहकांची सुमारे १ लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आता नवीन प्रणाली अधिक सुधारित आणि सुटसुटीत असेल असेही सीतारामन यांनी सांगितले. जीएसटीमुळे ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आले असल्याचे त्या बोलल्या.

Budget 2020 : केंद्रिय अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

जेटलींची आठवण
अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना सीतारामन यांनी दिवंगत भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची आठवण काढली. जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असे सांगत निर्मला सीतारामन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT