hotel 
अर्थविश्व

Budget 2020 : आता हॉटेलपेक्षा बंदुकीचा परवाना मिळणे सोपे...! 

वृत्तसंस्था

दिल्ली ः जागतिक बॅंकेच्या उद्योगानुकूलता (इज ऑफ डुइंग बिझनेस) क्रमवारीत भारताने 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 142 वरून 63 व्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र प्रत्यक्षात व्यवसाय सुरू करण्यात लालफितीचा कारभार, परवाना राजचा अडथळा मोठा असल्याचे वास्तव आर्थिक पाहणी अहवालातूनच पुढे आले आहे.

दिल्लीत हॉटेलसाठी पोलिसांकडून लागणाऱ्या परवान्यांची संख्या तब्बल 45 आहे. तर बंदुकीसाठी फक्त 19 आणि फटाक्‍यांसाठी केवळ 12 परवाने लागतात. 

आर्थिक पाहणी अहवालात भारतातील उद्योगानुकूलतेवरील प्रकरणात या अडथळ्यांची चर्चा करण्यात आली आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात रेस्टॉरंट सुरू करायचे असेल, तर वेगवेगळ्या विभागांच्या परवानग्यांचा त्रास मोठा आहे. एकीकडे चीन किंवा सिंगापूरमध्ये यासाठी अवघे चार परवाने लागतात. तर भारतात रेस्टॉरंट थाटण्यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या भरमसाट आहे.

दिल्लीसारख्या शहरात रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी 26 प्रकारच्या परवान्यांची आवश्‍यकता असते. तर बंगळूरमध्ये 36, मुंबईत 22 परवाने लागतात. याखेरीज दिल्लीत या व्यवसायासाठी याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये पोलिसांकडून 45 प्रकारचे परवाने घ्यावे लागतात. त्या तुलनेत दिल्लीमध्ये बंदुकीचा परवाना घेण्यासाठी फक्त 19 प्रकारचे दस्तावेज लागतात.

सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रह्मण्यम यांनीही पत्रकारांशी बोलताना दिल्लीत बंदुकीचा परवाना मिळविण्यासाठी कमी दस्तावेज लागतात. परंतु हॉटेलसाठी परवान्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले. 

प्रक्रिया कालावधी जास्तच 
आर्थिक पाहणी अहवालानुसार भारतात उद्योग सुरू करण्यासाठीच्या कालावधीत लक्षणीय घट झाली असली तरी या दिशेने आणखी काम करण्याची गरज आहे. भारतात उद्योग सुरू करण्यासाठी 10 प्रक्रिया पार पाडण्यासाठी 17 ते 18 दिवस लागतात. तुलनेत इंडोनेशिया आणि ब्राझीलमध्ये 11 प्रक्रिया आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी इंडोनेशियामध्ये लागणारा कालवधी अवघ्या चार दिवसांचा आहे. परंतु ब्राझीलमध्ये भारताइतकाच वेळ लागतो, असेही अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT