Budget 2023 Sakal
अर्थविश्व

Budget 2023 : बजेटपूर्वी 'हलवा समारंभ' का केला जातो? जाणून घ्या, त्याच्यामागचे काय आहे कारण

हलवा समारंभ काय आहे आणि भारतीय अर्थसंकल्पामध्ये त्याचे महत्त्व काय आहे.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी अर्थसंकल्पाची छपाई हलवा समारंभाने सुरू होते, मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे ही परंपरा पूर्णत: बंद पडली. यंदा ही परंपरा पुन्हा पाळली जाईल, अशी अपेक्षा आहे.

हलवा खायला देऊन बजेट छपाईचे उद्घाटन :

अर्थसंकल्प सादर होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी, देशाचे अर्थमंत्री नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थ मंत्रालयाच्या सहकाऱ्यांना हलवा खायला देऊन बजेट दस्तऐवजाच्या छपाईला सुरुवात करतात. चला जाणून घेऊया हा हलवा समारंभ काय आहे आणि भारतीय अर्थसंकल्पामध्ये त्याचे महत्त्व काय आहे.

हलवा समारंभ काय आहे ?

भारतीय संसदीय परंपरेनुसार, दरवर्षी देशाचे अर्थमंत्री अर्थसंकल्पाची कागदपत्रे वाचून सभागृहासमोर मांडतात. हे बजेट दस्तऐवज नियमितपणे दोन भाषांमध्ये (हिंदी आणि इंग्रजी) छापले जाते.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

अर्थसंकल्प गोड म्हणा किंवा सर्वांसाठी शुभ व्हावा, या विचाराने छपाईच्या प्रक्रियेपूर्वी हलवा तयार केला जातो. यामध्ये एका मोठ्या पातेल्यात खीर तयार केली जाते आणि देशाचे अर्थमंत्री आपल्या मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना त्याचे वाटप करतात.

अशा प्रकारे हा सोहळा साजरा केला जातो :

  • अर्थसंकल्पीय कागदपत्रांची छपाई सुरू होण्याच्या खूप आधीपासून हलवा समारंभ साजरा केला जात आहे.

  • हलवा एका मोठ्या पातेल्यात तयार केला जातो, जो मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये वाटला जातो.

  • हलव्याचे वाटप झाल्यानंतर अर्थ मंत्रालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंत्रालयातच संपूर्ण जगापासून दूर राहावे लागते.

  • हे असे कर्मचारी आहेत जे बजेट बनवण्याच्या आणि त्याच्या छपाईच्या प्रक्रियेत थेट सामील आहेत.

  • अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प सादर करेपर्यंत हे कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवरही संपर्क साधू शकत नाहीत.

फक्त काही लोकांना घरी जाण्याची परवानगी :

या सोहळ्यानंतर अर्थ मंत्रालयातील केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी आहे. अंदाजपत्रक बनवण्याच्या आणि छापण्याच्या प्रक्रियेत साधारणतः 100 लोक गुंतलेले असतात. लोकसभेत अर्थसंकल्प सादर होईपर्यंत सर्व अधिकारी नॉर्थ ब्लॉकच्या बजेट प्रेसमध्ये राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT