ब्लॉक डील sakal
अर्थविश्व

बल्क आणि ब्लॉक डील

शेअर बाजारात दररोजचे व्यवहार अचंबित करणारे असतात. बीएस्ई आणि एन्एस्ई

गोपाळ गलगली

शेअर बाजारात दररोजचे व्यवहार अचंबित करणारे असतात. बीएस्ई आणि एन्एस्ई यांवर होणाऱ्या एकूण व्यवहारांची दररोजची किंमत साधारण १३,००० कोटी रुपयांच्या आसपास असते. ही सर्व करामत सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० या वेळेत होत असते. यावरून कल्पना करा, की केवढा प्रचंड व्यवहार या दोन संस्था दररोज करीत असतात. लक्षात घ्या, या सर्व व्यवहारांवर सरकार भरपूर उत्पन्न मिळवित असते आणि आपणसुद्धा नफा किंवा तोटा!

तुम्ही-आम्ही फार तर १००/५००/१००० शेअरचा हजारो-लाखो रुपयांचा व्यवहार करीत असू. पण अशा व्यवहारांची संख्या फारच कमी असते. पण मोठे व्यवहार, ज्याला घाऊक व्यवहार (बल्क किंवा ब्लॉक) म्हणता येईल, असे अनेक व्यवहार या मोठ्या संख्येला जबाबदार असतात. मोठमोठ्या परकी वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड्स, श्रीमंत गुंतवणूकदार हे लाखो-कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करीत असतात, ते आपल्या लगेच लक्षात येत नाहीत. कारण असे व्यवहार ‘बल्क डील’ अथवा ‘ब्लॉक डील’मध्ये होत असतात आणि त्यावर स्टॉक एक्स्चेंजचे बारीक लक्ष असते. कारण अशा व्यवहारांमुळे शेअरच्या भावात आणि निर्देशांकात मोठा फरक पडत असतो.

बल्क डील

ज्या व्यवहारांमधे एखाद्या शेअरचे त्या कंपनीच्या एकूण शेअरपैकी ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार होतात, त्याला ‘बल्क डील’ म्हणतात. असे व्यवहार दिवसाच्या व्यवहारांमध्ये किंवा ‘ब्लॉक ट्रेडिंग विंडो’मधून होत असतात. असे अनेक व्यवहार होत असतात. मात्र, ०.५ टक्क्याची सीमा ओलांडली, की लगेच एक्स्चेंजला कळवावे लागते.

ब्लॉक डील

या व्यवहारात एखाद्या कंपनीचे ५ लाखांपेक्षा जास्त किंवा रु. ५ कोटींपेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार येतात. यासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवण्यात आलेली असते. बाजार सुरू झाल्यापासून ३५ मिनिटांपर्यंत असे व्यवहार होत असतात. मात्र, शेअरच्या किंमतीवर बंधन असते. ते असे, की शेअरची किंमत या ३५ मिनिटांच्या काळात कालच्या बंद भावापेक्षा किंवा आजच्या खुल्या भावापेक्षा एक टक्क्यापेक्षा कमी/जास्त असता कामा नये. मात्र, काही कंपन्या ०.५ टक्क्यापेक्षा थोडा व्यवहार कमी करून या नियमापासून पळ काढत असतात. असे व्यवहार ‘स्क्वेअर आॅफ’ करता येत नाहीत.

(लेखक शेअर बाजाराचेअनुभवी जाणकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT