Business Idea Sakal
अर्थविश्व

Business Idea : 'हा' व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देईल निम्मे पैसे; होईल प्रचंड कमाई

स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Business Idea: स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करेल. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव बल्यान यांनी मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून तरुणांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याबाबत सांगितले.

सरकारी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. सरकारच्या या योजनेबद्दल जाणून घ्या.

सरकार देईल 50 टक्के अनुदान :

राष्ट्रीय गोकुळ मिशन ही सरकारची महत्त्वाची योजना आहे. याअंतर्गत गाय, म्हैस, डुक्कर, कोंबडी, शेळीपालन फार्म आणि सायलेज युनिटला अनुक्रमे 4 कोटी, 1 कोटी, 60 लाख, 50 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. एकूण रकमेपैकी 50% सबसिडी भारत सरकार देईल आणि त्याव्यतिरिक्त, AHIDF योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेवर 3% व्याज सवलत देखील मिळू शकते.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार रोजगार :

डॉ. संजीव बल्यान म्हणाले की, त्यांचा विभाग 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देईल. ते म्हणाले की, राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत देशी गायींच्या संगोपनाला प्रोत्साहन दिले जात आहे.

एकूण 90,598 नोकऱ्यांपैकी 16,000 तरुणांना मैत्री योजनेअंतर्गत रोजगार मिळाला आहे. देशातील तरुणांना मंत्रालयाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जनावरांच्या उपचारासाठी 4,332 हून अधिक फिरते पशुवैद्यकीय युनिट सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बाल्यान यांनी इतर मंत्रालयांद्वारे युवकांसाठी क्रीडा, विज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.

ज्यामुळे युवक पूर्ण ताकदीने वाढू शकतील. आमचे सरकार युवकांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित असून भविष्यातही हे कार्य सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.

'नवीन राष्ट्रीय युवा धोरण' अभूतपूर्व पाऊल :

ते म्हणाले की, प्रस्तावित 'नवीन राष्ट्रीय युवा धोरण' हे देशातील तरुणांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक अभूतपूर्व पाऊल आहे, ज्यामध्ये युवकांच्या विकासासाठी 10 वर्षांचा विचार केला गेला आहे. या योजनेंतर्गत शिक्षण, रोजगार, उद्योजकता यासह पाच क्षेत्रांत व्यापक काम केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT