Sensex-&-Nifty
Sensex-&-Nifty 
अर्थविश्व

व्यापारयुद्धाचे बाजारावरील सावट दूर

सकाळ न्यूज नेटवर्क

सेन्सेक्‍समध्ये २९१ अंशांची वाढ; निफ्टी ७६ अंशांनी वधारला
मुंबई - अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचे सावट दूर झाल्याने सोमवारी शेअर बाजारात तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २९१ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ६८६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७६ अंशांनी वधारून ११ हजार ८६५ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍सच्या मंचावर आज टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, इंड्‌सइंड बॅंक आणि आरआयएल यांच्या समभागात ३.२३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. याचवेळी ओएनजीसी, एचसीएल टेक, मारुती, एचयूएल, एशियन पेंट्‌स आणि वेदांता यांच्या समभागात ३.९९ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. शेअर बाजारात आज बांधकाम, वाहननिर्मिती, वित्तीय आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात २.५९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली. 

केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांचा वेग कायम राहण्याची अपेक्षा आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मोदी-ट्रम्प भेटीचा परिणाम 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत व्यापारविषयक तोडग्यासाठी दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांची लवकरच बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे अमेरिका आणि भारताच्या दरम्यान असलेले व्यापारविषयक मुद्दे सुटण्याच्या शक्‍यतेने शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT